International Picnic Day 2025 : पिकनिक… एक असा शब्द, जो ऐकला की लगेचच मनात उत्साह निर्माण होतो. मित्रमंडळी, निसर्गरम्य ठिकाण, घरून आणलेले स्वादिष्ट पदार्थ आणि आनंदी हास्याचे क्षण यामुळे पिकनिक हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक संस्मरणीय अनुभव ठरतो. पण तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी १८ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन’ म्हणून साजरा केला जातो? या खास दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात.
पिकनिक दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. ‘पिकनिक’ हा शब्द मूळतः फ्रेंच आहे. १८०० च्या दशकात फ्रेंच राज्यक्रांतीनंतर लोकांना सार्वजनिक बागांमध्ये जाऊन आपल्या प्रियजनांसोबत जेवण घेण्याची मुभा मिळाली. त्यावेळी लोकांनी हे आनंदाचे क्षण साजरे करणे सुरू केले आणि यालाच पुढे ‘पिकनिक’ असे नाव मिळाले. याच पार्श्वभूमीवर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वरूपात स्वीकारण्यात आला.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लांब वीकेंड किंवा ऑफिसमधून मिळालेली विश्रांती – या सगळ्या गोष्टी पिकनिकसाठी योग्य कारणं ठरतात. आल्हाददायक हवामान, हिरवळ आणि जवळचे लोक असेल तर पिकनिकची मजा दुप्पट होते. या आंतरराष्ट्रीय पिकनिक दिनी तुम्हीही काही खास करण्याचा विचार करत असाल, तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पिकनिकसाठी परिपूर्ण आहेत. खाली दिलेल्या काही निवडक ठिकाणांची माहिती आपल्याला यंदाचा पिकनिक डे संस्मरणीय बनवण्यास मदत करेल.
१. राजदरी धबधबा, उत्तर प्रदेश
वाराणसीपासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अत्यंत रम्य आणि निसर्गसंपन्न आहे. वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, आजूबाजूची हिरवळ आणि शांतता – हे सर्व मिळून हे ठिकाण पिकनिकसाठी सर्वोत्तम बनवतात.
हे देखील वाचा : Viscacha : किती गोड! दक्षिण अमेरिकेतील आळशी दिसणारा, पण साहसी आणि कणखर असा ‘हा’ गोंडस छोटा प्राणी
२. लोधी गार्डन, दिल्ली
राजधानी दिल्लीमधील खान मार्केटजवळ असलेले लोधी गार्डन हे इतिहास आणि निसर्ग यांचे संगमस्थान आहे. सय्यद मोहम्मद शाह आणि सिकंदर लोधी यांची मकबरे, सुंदर फुले आणि विस्तीर्ण हरित क्षेत्र यामुळे हे ठिकाण दिल्लीकरांचे आवडते पिकनिक स्पॉट बनले आहे.
३. दशम धबधबा, झारखंड
रांचीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेला दशम धबधबा शांतता आणि निसर्गप्रेमींना भुरळ घालतो. १४४ फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा ‘कांची’ नदीमुळे तयार झाला असून शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम आहे.
credit : social media
४. कुकराईल राखीव वन, लखनऊ
लखनऊ शहराजवळील हे राखीव वन म्हणजे एक नैसर्गिक खजिना आहे. झाडाझुडपांमध्ये हरवलेले ट्रेल्स, विविध प्राणीप्रजाती आणि सायकलिंगचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. कुटुंबासोबत येथे वेळ घालवणे ही एक सुखद अनुभूती असते.
पिकनिक डे साजरा करण्याचे उपाय
या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-परिवारासोबत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू शकता. घरून तुमचे आवडते स्नॅक्स घेऊन जा, काही मैदानी खेळ खेळा, गाणी ऐका किंवा गप्पा मारा, हे सगळे मिळून हा दिवस खास बनवू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : महायुद्ध अटळ! ‘इराणने इस्रायलसाठी नरकाचे दरवाजे उघडले’; प्रचंड क्षेपणास्त्र हल्ल्याने तणाव शिगेला
आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन
आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन म्हणजे केवळ निसर्गात फिरणे नाही, तर तणावमुक्त होण्याची, आपल्या प्रियजनांसोबत आनंद साजरा करण्याची एक संधी आहे. यंदाचा १८ जून एक आठवणींनी भरलेला दिवस ठरावा यासाठी निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याची आणि पिकनिकचा आनंद लुटण्याची तयारी जरूर करा!