
mojtaba khamenei appointed as new iran supreme leader israel warning
Mojtaba Khamenei Iran’s New Supreme Leader : मध्यपूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता अधिक भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत, इराणने अखेर आपला नवा ‘सुप्रीम लीडर’ (सर्वोच्च नेता) निवडला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या शक्तिशाली पदावर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी ( Mojtaba Khamenei) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे केवळ इराणमध्येच नाही, तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. विशेषतः इस्रायल आणि अमेरिका या देशांनी या निवडीवर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
इराणमधील ८८ अत्यंत प्रभावशाली धार्मिक नेत्यांची संघटना असलेल्या ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने मोज्तबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. इराणच्या कायद्यानुसार, सर्वोच्च नेत्याची निवड ही लोकशाही पद्धतीने होत नाही, तर ही परिषद धार्मिक आणि राजकीय पात्रता पाहून निर्णय घेते. २८ फेब्रुवारी रोजी तेहरानवर झालेल्या भीषण हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर देशात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. जवळपास एक आठवडा तीन सदस्यीय समितीने देशाचा गाडा हाकला, मात्र युद्धाच्या छायेत असलेल्या इराणला एका खंबीर नेत्याची गरज होती, जी आता मोज्तबा यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei गायब की ठार? 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतरचे सर्वात मोठे गूढ; इस्रायलच्या रडारवर आता खामेनींचा वारस
मोज्तबा खामेनी हे अली खामेनी यांचे दुसरे पुत्र आहेत. जरी इराणमध्ये राजेशाही नसली आणि नेतृत्व वंशपरंपरागत नसेल, तरीही मोज्तबा यांचे लष्करी आणि धार्मिक वर्तुळात मोठे वजन आहे. इराणच्या सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) मध्ये त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या वडिलांच्या सावलीत राहून पडद्यामागून देशाची धोरणे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते. आता अधिकृतपणे पद मिळाल्याने, इराणची इस्रायलविरोधी आक्रमकता अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Mojtaba Khamenei has been chosen by Iran’s Assembly of Experts to succeed his late father, Ali Khamenei, as the country’s new supreme leader. The 56-year-old cleric was appointed more than a week after his father was killed in an airstrike during the ongoing war. As Iran’s… pic.twitter.com/ekGJb10hTb — Al Arabiya English (@AlArabiya_Eng) March 8, 2026
credit – social media and Twitter
मोज्तबा खामेनी यांची निवड होताच इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) एक अत्यंत आक्रमक विधान प्रसिद्ध केले आहे. इस्रायलने म्हटले आहे की, “आमचा लांब हात खामेनीच्या वारसापर्यंत पोहोचण्यास वेळ लावणार नाही.” इस्रायलने स्पष्ट केले आहे की, जर इराणने आपल्या धोरणांमध्ये बदल केला नाही किंवा इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण केला, तर मोज्तबा खामेनी हे देखील इस्रायलच्या रडारवर असतील. या विधानामुळे येणाऱ्या काळात इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष थेट वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Persian Gulf Energy Supply: पर्शियन आखातातून कोणत्या देशांना ऊर्जा पुरवठा होतो; भारत त्यांच्यावर किती अवलंबून आहे?
मोज्तबा यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा अमेरिका आणि इराणमधील संबंध नीचांकी पातळीवर आहेत. मोज्तबा हे कट्टरपंथीय विचारांचे मानले जातात. त्यामुळे पाश्चात्य देशांशी चर्चा करण्यापेक्षा ते रशिया आणि चीनसारख्या देशांशी संबंध अधिक दृढ करतील, असा अंदाज आहे. इराणमधील तरुण पिढीमध्ये मोज्तबा यांच्या निवडीबाबत काही प्रमाणात नाराजी असली, तरी लष्करी पाठबळामुळे सध्या त्यांच्या सत्तेला कोणतेही आव्हान दिसत नाही.
Ans: मोज्तबा खामेनी हे इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र असून ते आता इराणचे नवे 'सर्वोच्च नेते' बनले आहेत.
Ans: इराणमध्ये 'सर्वोच्च नेता' हा राष्ट्राध्यक्षांपेक्षाही शक्तिशाली असतो. सैन्य, न्यायव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणांवर त्यांचेच अंतिम नियंत्रण असते.
Ans: इस्रायलने म्हटले आहे की, त्यांचे सैन्य मोज्तबा खामेनी यांनाही लक्ष्य करू शकते, जसे त्यांनी इतर दहशतवादी नेत्यांना किंवा विरोधकांना केले आहे.