More Than 9.1 milliom animals sacrificed on Bakri Eid in Bangladesh
ढाका: नुकतेच ६ जून आणि ७ जून रोजी ईद-उल-अजहा म्हणजे बकरी ईद सण पार पडला. या सणाला मुस्लिम बांधवांमध्ये खूप महत्व दिले जाते. दरम्यान या सणादिवशी जगभरात लाखो प्राण्याची कुर्बानी देण्यात आली. तसेच बांगलादेशातही हा सण साजरा करण्यात आला. बांगलादेशच्या मत्स्यव्यवसाय आणि पशुधन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईद निमित्त बांगलादेशात ९१ लाखाहून अधिक प्राण्यांची कुर्बानी आली.
धक्कादायक बाब म्हणजे बकरी आणि इतर प्राण्यापेक्षा जास्त गायींचा बळी देण्यात आला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या अहवालानुसार, या वर्षी ४६.५ लाख गायी आणि म्हशींची कुर्बानी देण्यात आली आहे, तर ४४.३ शेळ्या आणि मेढ्यांची कुर्बीनी देण्यात आली.
याशिवाय इतर अनेक प्राण्यांचा देखील बळी देण्यात आला. पशुसंवर्धन विभागाच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशात मोठ्या संख्येने जनावरांची वाढत झाली होती. सुमारे ३३.१० लाख जनावरे विकली गेली नाहीत. अहवालात सांगण्यात आले आहे की, विक्री न झालेल्या प्राण्यांची ईद व्यतिरिक्त विविध धार्मिक विधी आणि समारंभांसाठी कत्तल केली जाण्याची शक्यता आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, बांगालदेशातमध्ये सर्वाधिक बळी राजेशाही विभागात देण्यात आला आहे. जवळपास २३.२४ लाख प्राण्यांचे बळी देण्यात आला. तसेचट देशाची राजधानी ढाक्यात २१.८५ प्राण्यांचा बळी देण्यात आला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. चितगावमध्ये १७.५३ लाख, रंगपूरमध्ये ९.४६ लाख आणि खुलानमध्ये ८.०४ लाख प्राण्यांचा बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यात आली आहे.
तर बरीसालमध्ये ४.७ लाख प्राण्यांची कुर्बानी देण्यात आली आहे. तसेच मैमनसिंगमध्ये ३.८३ लाख आणि सिल्हेट विभागात ३.१९ लाख लोकांनी प्राण्यांचा बळी दिली आहे.
इ-उल-अझहा म्हणजेच बकरी ईद हा मुस्लिम बांधवांमध्ये महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी श्रीमंत मुस्लिम ३ दिवस प्राण्यांची कुर्बानी देतात. धर्मगुरु इब्राहिम यांनी अल्लाहसाठी केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून प्राण्यांचा बळी दिली जातो. मेंढ्या, बकरी, म्हैस, गाय, उटं या प्राण्यांचा बळी देण्यात येतो. ईदचा पहिला दिवस नमाजाने सुरु होतो आणि नंतर तीन दिवस, प्राण्यांची कुर्बानी दिली जाते.
दरम्यान संपूर्ण जग बकरी ईद साजरी करत असताना मोरोक्कोमध्ये प्राण्यांच्या कुर्बानीवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे मोरोक्कोमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये संतापाचे वातावरणे होते. परंतु गेल्या सहा वर्षापासून दुष्काळाने मोरोक्को ग्रस्त आहे. अशातच पशुसंख्येत घट होत चालल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.