
Moscow Bomb Blast
रशियाचा युक्रेनमध्ये कहर ! एका आठवड्यात तब्बल ‘इतक्या’ ड्रोन अन् बॉम्बसचा मारा; झेलेन्स्की संतप्त
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (२२ डिसेंबर) रोजी मॉस्कोमध्ये कार ब्लास्ट झाला. यामध्ये रशियाच्या ५६ वर्षीय लेफ्टनंट फनिल सर्वारोव्ह मारले गेले आहे. रशियाच्या तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वारोव्ह कारमध्ये बसताच हा स्फोट जाला होता. त्यांना स्वत:चा जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही. या स्फोटाने संपूर्ण मॉस्को हादरला आहे. ही घटना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासाठी धक्कादायक मानली जात आहे. कारण फनिल सरवारोव्ह हे पुतिन यांच्या जवळचे मानले जातात. यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे.
सध्या हा स्फोट नेमका कसा झाला याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. रशियन अधिकाऱ्यांनी हत्येचा संबंध युक्रेनशी जोडला आहे.रशियन सरकारच्या सर्वारोव्ह मॉस्कोतील त्यांच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना हा शक्तिशील स्फोट झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
क्रेमलिनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही माहिती पुतिन यांना देण्यात आली असून त्यांना याचा मोठा धक्का बसाल आहे. सध्या स्फोटाची चौकशीचे आदेश पुतिन यांनी दिले आहेत. रशियात कार स्फोटात लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू ही दोन वर्षात तिसरी मोठी घटना आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सर्वारोव्ह यांचा जन्म १९६९ मध्ये रशियात पर्म ग्रेम्याचिन्स्क येथे झाला होता. त्यांनी १९९० मध्ये रशियन सैन्यात सहभाग घेतला. त्यांनी काझान हायर टँक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना २००८ मध्ये रशियाच्या सशस्त्र दलाचे जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच ते अध्यक्ष पुतिन यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी काकेशमधील लष्करी मोहेमत मोठी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच त्यांनी २०१५-१६ मध्ये सीरियात युद्धाचे नेतृत्वही केले होते. युक्रेनसोबतच्या युद्धातही त्यांनी सैन्याला प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.
रशियाचा कहर! युक्रेनच्या ओडेसा बंदरावर घातक प्रहार ; हल्ल्यात ८ जण ठार, अनेक जखमी
Ans: मॉस्कोमध्ये कार बॉम्ब स्फोट झाला आहे. रशियाचे लष्कर लेफ्टनंट जनरल फानिल सरवरोव कारमध्ये बसताचा हा स्फोट घडला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Ans: फानिल सरवरोव हे रशियाच्या सशस्त्र दलाच्या ऑपरेशनल ट्रेनिंग विभागाचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निकटवर्तीय होते.