रशियाचा कहर! युक्रेनच्या ओडेसा बंदरावर घातक प्रहार ; हल्ल्यात ८ जण ठार, अनेक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी
युक्रेनच्या आपत्कानी सेवांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२० डिसेंबर) पहाटे हा हल्ला घडला. रशियाने या हल्ल्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. या हल्ल्यात एका पार्किंग ट्रकला आग लागली असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर दाखल युक्रेनने देखील हल्ला केला आहे. युक्रेनने देखील रशियाच्या युद्धनौका आणि इतर काही सुविधांना लक्ष्य केले आहे. युक्रेनच्या जनरल स्टाफने दिलेल्या माहितीनुसार रशियावरील हल्ल्यात रशियाच्या ओखोटनिक युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आले आहे. जहाज एका कॅस्पियन समुद्रातील तेल आणि वायू उत्पादन प्लॅटफॉर्मजवळ गस्त घालत होते.
सध्या रशिया युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र सर्वाधिक फटका युक्रेनच्या पायाभूत सुविधांना बसला आहे. शिवाय युक्रेनचे अनेक भाग रशियाने ताब्यात घेतले आहेत. गेल्या चार वर्षांपासून या युद्धामुळे युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
याच वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनसमोर युद्धबंदीसाठी एक अटक ठेवली आहे. ही अट मान्य झाल्यानंतर रशिया युक्रेनवरील हल्ले थांबवेल असे म्हटले आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, युक्रेनला शांतता हवी असेल तर चर्चेच्या अटी सोडून रशियाच्या ताब्यातील प्रदेशांवरील दावे सोडावेत. यानंतरच रशिया युद्धबंदी करारावर सहमत होईल असे पुतिन यांनी म्हटले आहे.
🤬🤬💔 Terrible…
7 killed. 15 injured. russian terrorists struck port infrastructure in the Odesa region.
People were killed in their cars. Ordinary lives. Ordinary roads. This is what russia brings.
Nothing else. pic.twitter.com/zWnmI4bD2f — Angelica Shalagina🇺🇦 (@angelshalagina) December 19, 2025
Putin Ukraine-War News: ‘मी युद्ध थांबवेन पण…’ पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवली अशी अट






