Muhammad Yunus Says Sheikh Hasina and family will be prosecuted crime against humanity
ढाका: बांगलादेशात सध्या मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. दरम्यान शेख हसीनांवरील आरोप अजूनही थांबलेले नाहीत. याचवेळी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद सुनूस यांनी शेख हसीनांवर मानेवतेविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल असे म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे की, शेख हसीना यांच्यावर खटला दाखल केला जाईलच, शिवाय त्यांच्या परिवारावरही खटला दाखल करण्यात येईल. 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला.
शेख हसीनांवरील आरोप
या आंदोलनात झालेल्या मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचा आरोपही शेख हसीना यांच्यावर करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात यासंबंधि माहिती प्रसिद्ध केली होती. या अहलवालानुसार, शेख हसीना यांच्या पोलिस आणि अधिकाऱ्यांनी मानवी हक्काविरुद्ध हिसांचार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
मोहम्मद युनूस यांनी सांगितले की, हसीनांच्या अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आली आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, शेख हसीना यांना देशात परत आणण्यासाठी औपचारिक रित्या मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र अद्याप भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शेख हसीनांवर कारवाई
मोहम्मद युनूस यांनी मुलाखती दरम्यान म्हटले की, शेख हसीना बांगलादेशात राहिल्या किवां भारतात राहिल्या तरीही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गेल्या वर्षी सत्तेवरुन काढून टाकल्यापासून हसीनांवर त्यांचे सहकारी आणि देशभरातील गुप्त तुरुंगावर पाळत ठेवल्याचाही आरोप आहे. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात येण्याच्या वेळी अधिकाऱ्यांनी पलून जाण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मोहम्मद युनूस यांनी कथित गुन्हांमध्ये आरोपींना ओळखण्यास वेळ लागत असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की यामध्ये शेख हसीना आणि त्यांचे सहकारी सर्व सामील होते.
शेख हसीना यांचे जोरदार कमबॅक
बांगलादेशात 2025 च्या अखेरपर्यंत निवडणुका होणार असल्याचे युनूस यांनी म्हटले आहे. मात्र काही दिवासांपूर्वी झालेल्या जिल्हा वकिल संघ (बार असोसिएशन) निवडणुकीत शेक हसीना यांचे जोरदार कमबॅक झाले आहे. यामुळे सध्या सत्तेवर असलेल्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला मोठा झटका बसला आहे. देशाचील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शेख हसीना यांना सत्तेवरून बेदखल करणाऱ्या विद्यार्थी गटाने नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या नाहिद इस्लाम या गटाचे नेतृत्व करणार आहे. यामुळे सध्या बांगलादेशात मोठ्या राजकीय परिवर्तनाची शक्यता आहे.