Mumbais Dabbewala Organization Condoles The Death Of Elizabeth Ii Nrgm
मुंबईचा डब्बेवाला’ संघटनेकडून एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. एलिझाबेथ द्वितीय यांची तब्येत नाजूक असल्याचे याआधीच बकिंगहम पॅलेसकडून सांगण्यात आले होते. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : ‘मुंबईचा डब्बेवाला’ (Mumbaicha Dabewala Organisation) संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ (Queen Elizabeth Second) दुसऱ्या यांच्या निधनावर शोक (Condoles) व्यक्त केला आहे. किंग चार्ल्स (King Charles) यांनी भारतभेटीदरम्यान (Visit India) मुंबईच्या डब्बेवाल्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोघांनीही संबंध जपले होते.
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. एलिझाबेथ द्वितीय यांची तब्येत नाजूक असल्याचे याआधीच बकिंगहम पॅलेसकडून सांगण्यात आले होते. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आठवणींना उजाळा देत एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. प्रिन्स चार्ल्स भारतात आल्यापासून मुंबईच्या डब्बावाल्यांचे ब्रिटीश राजघराण्याशी अतिशय जवळचे नाते आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आणि सर्व डब्बेवाल्यांकडून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना, असा शोक तळेकर यांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Mumbais dabbewala organization condoles the death of elizabeth ii nrgm