म्यानमार आर्मीने केला आपल्याच नागरिकांवर हल्ला
या हल्ल्यात तब्बल 24 नागरिकांचा मृत्यू
50 पेक्षा जास्त नागरिक जखमी
म्यानमारमध्ये लष्कराने एका गावावर हल्ला केला आहे. म्यानमार लष्कराने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला आहे. यामध्ये 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मध्यवर्ती भागांमध्ये सागाईंग प्रदेशातील एका गावावर लष्कराने हल्ला केला.
समोर आलेल्या माहितीनुसार, सागाईंग नावाच्या गावात एक उत्सव सुरू होता. यावेळेस त्या ठिकाणी म्यानमार सरकारने बंदी केलेल्या राजकीय कैद्यांना सोडवण्याची मागणी करण्यासाठी एक रॅली काढण्यात आली. दरम्यान त्यावेळेस एका पॅराग्लायडरने दोन बॉम्ब टाकले. यामध्ये सुमारे 40 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
म्यानमारमधील मोनिवा येथील लष्कराच्या तुकडीने पॅराग्लायडरच्या हालचालींचा आढावा होता. तसेच या रॅलीबाबत गावकऱ्यांना इशारा देण्यात आला होता. मात्र हल्ला इतक्या लवकर झाला की प्रतिसाद किंवा विरोध करण्यासाठी कोणाला वेळ मिळाला नाही. त्या गावावर दोन बॉम्ब टाकले गेले, त्यामुळे तिथे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या हल्ल्यात 50 नागरिक जखमी
म्यानमारमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्यात 50 नागरिक जखमी झाले आहेत. तर 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2021 पासून म्यानमारमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत लष्कराने केलेल्या कारवाईत सात हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हल्ल्याची जबाबदारी लष्कराने नाकारली
म्यानमार लष्कराने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे. म्यानमारमधील स्थिती पाहून तेथील नागरिकांना सुरक्षेची आणि संरक्षणाची तत्काल गरज असल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या निवेदनात म्हटले.
पाकिस्तानी सैन्यावर भयानक हल्ला
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात अतिरेक्यांनी केलेल्या सुनियोजित हल्ल्यात निमलष्करी दलाचे अकरा जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्यांमध्ये नऊ सैनिक आणि दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अफगाण सीमेजवळील कुर्रम जिल्ह्यात हा हल्ला झाला असून, दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला. हल्लेखोरांनी प्रथम रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॉम्बचा (IED) स्फोट केला. हा स्फोट होताच मोठ्या संख्येने आलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात ११ जवान शहीद झाले असून, अनेक सैनिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर ताफ्याला आगही लागल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठी शोध मोहीम (Search Operation) सुरू केली आहे