Myanmar Earthquake Myanmar shaken by strong earthquake tremors Fear among people
Earthquake in Myanmar : नेपीडॉ : भारताचा शेजारील देश म्यानमारमध्ये (Myanmar) भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पहाटे (भारतीय वेळेनुसार) २.४२ वाजता हा भूकंप झाला. याचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खोल होते, यामुळे भूकंपाचे जोरदार झटके जाणवले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरु याची माहिती शेअर केली. यामध्ये म्यानमारमध्ये ४.२ तीव्रतेचा भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. या भूकंपाचे केंद्रबिंदू २०.८८ उत्तर अक्षांश आणि ९५.८२ पूर्व रेखांशावर होते.सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची किंवा वित्तहानी झालेली नाही. परंतु (NCS)ने लोकांना सतर्क राहण्याचा आणि खबरदारी बाळगण्याचा इशारा जारी केला आहे.
सौदी अरेबियाने आवळला फाशीचा दोर ; एक दिवसातील शिक्षेचा आकडा वाचून बसेल धक्का
EQ of M: 4.2, On: 04/08/2025 02:42:47 IST, Lat: 20.88 N, Long: 95.82 E, Depth: 10 Km, Location: Myanmar.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjcVGs @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/Lzgii1q9Jl— National Center for Seismology (@NCS_Earthquake) August 3, 2025
म्यानामार हा भूकंपप्रवण आणि नैसर्गिक आपत्ती क्षेत्र आहे. या भागात भूंकापचे झटके, लांब किनारपट्टीमुळे त्सुनामीचा धोका सतत येत असते. म्यानमारचा भाग चार टेक्टोनिक प्लेट्सच्या म्हणजेच भारतीय, युरेशियन, सुंडा आणि बर्मा प्लेट्सच्या जंक्शनवर स्थित आहे. यामुळे या भागात प्लेट्सच्या सतत हालचाली होत असतात. यामुळे म्यानमारमध्ये सतत भूकंप आणि त्सुनामीचा धोका असतो.
म्यानमारचे भूगर्भीय क्षेत्र १,४०० किलोमीटर लांबीचे आहे. हे क्षेत्र अंदमान विस्तार केंद्राला उत्तरेकडे जोडलेले आहे. याला सागिंग फॉल्ट असे म्हटले जाते. यामुळे या भागात सागिंग, मंडाले, बागे आणि यांगून सारख्या प्रदेशांमध्ये भूकंप सतत होत असतात. म्यानमारच्या लोकसंख्येपैकी ४६% लोकसंख्या या प्रदेशांमध्ये राहते. यामुळे येथील लोकांचे जीवन सतत धोक्यात असते. नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे देखील परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
FAQs ( संबंधित प्रश्न)
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आत खोलवर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या खडकांच्या १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात, या सततच्या हालचालींमुळे ऊर्जेचा विस्फोट होतो, ज्यामुळे भूकंप घडतात.
म्यानमारमध्ये भूकंप का घडतात?
म्यानमार हे चार टेक्टोनिक प्लेट्सच्या म्हणजेच भारतीय, युरेशियन, सुंडा आणि बर्मा प्लेट्सच्या जंक्शनवर स्थित आहे. या प्लेट्सचे एकमेकांवर आदळल्याने घर्षण होते आणि उर्जेचा विस्फोट होतो. यामुळे या भागामध्ये सतत भूकंप होत असतात.
म्यानमारमधील सर्वात शक्तिशाली भूकंप
यापूर्वी म्यानमारमध्ये १९०३ मध्ये बागो प्रदेशात ७.० तीव्रतेचा भूकंपाचे झटके जाणवले होते याचा परिमाण यांगूनपर्यंत जाणवला होता.
जगाची चिंता वाढली! दिमित्री मेदवेदेव यांच्यामुळे होणार अणुयुद्ध? जाणून घ्या कोण आहेत?