जगाची चिंता वाढली! दिमित्री मेदवेदेव यांच्यामुळे होणार अणुयुद्ध? जाणून घ्या कोण आहेत? (फोटो सौजन्य सोशल : मीडिया)
America Russia Relations : वॉशिंग्टन/ मॉस्को : अलीकडे रशिया (Russia) आणि अमेरिकेच्या (America) संबंधामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) युद्धावरुन हा वाद सुरु आहे. याच वेळी एक नाव सध्या सर्वत्र जोरदार चर्चेत आहे, ते म्हणजे दिमित्री मेदवेदेव. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सुरक्षा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव सध्या त्यांच्या विधानामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. अमेरिकेने त्यांच्या विधान अणुधर्मीय धोका म्हणून वर्णन केले आहे.
नुकतेच मेदवेदेव यांनी म्हटले होते की, आम्ही इस्रायल किंवा इराण नाही. त्यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेला प्रत्येक अल्टीमेटम हा युद्धाचे आव्हान मानले जाईल. त्यांनी ट्रम्प यांना सोव्हिएत युनियन काळापापासून रशियाकडे अणु हल्ल्याची क्षमता असल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानाचा असा परिणाम झाला की, ट्रम्प यांनी रशियाजवळ दोन पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश दिले.
तसेच ट्रम्प यांनी दिमित्री मेदवेदेव यांच्या विधानावर टिप्पणी देखील केली. त्यांच्या विधानाला त्यांनी प्रभोक्षक म्हटले परंतु हे केवळ शब्दांपुरतेच मर्यादित राहिल असेही त्यांनी म्हटले. दोन्ही देशांनी एकमेकांना अणुशक्तीचा उघडपणे इशारा दिला आहे. यामुळे अणु युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.
रशियातील कामचटका प्रदेश हादरला; भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा स्फोट, VIDEO
दिमित्री मेदवेदेव हे रशियाच्या अध्यक्षपदी २००८ ते २०१२ पर्यंत राहिले आहेत. रशियाच्या संविधानामुळे रशियाचे सध्याचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना त्यावेळी अध्यक्ष होता आले नव्हते. यामुळे त्यांना पुतिन यांनी पुढे केले. दिमित्री मेदवेदेव हे व्लादिमिर पुतिन यांच्या सर्वात जवळचे मानले जातता. त्यांचा जन्म सेंट पीटर्सबर्ग च्या लेनिनग्राड येथे झाला आहे. त्यांनी सुरुवातील वकिल क्षेत्रात आपली सेवा दिली आहे. त्यानंतर १९९० च्या दशकात त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले.
तेव्हापासून दिमित्री यांनी पुतिन यांच्या विश्वास जिंकला आणि त्यांच्या जवळचे झाले. त्यांनी राष्ट्रपती होण्यापूर्वी गॅझप्रॉमचे अध्यक्ष, उपपंतप्रधान आणि कर्मचापी अशी अनेक महत्वाची पदे भूषवली आहे. त्यांनी राष्ट्रपती असताना दिमित्री यांनी न्यू स्टार्ट अणु करार आणि पोलिस सुधारणा यांसारखे शांततापूर्ण निर्णय घेतले आहे.
त्यांना एक उदारमतवादी आणि प्रगतशील नेता म्हणून ओळखले जात होते. परंतु २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर त्यांच्याबद्दल लोकांचे विचार बदलले. सध्या पाश्चात्य देशांना मेदवेदेव यांच्याकडून अनेक वेळा अणुहल्ल्याच्या धमक्या आल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत टीका केली जाते.
Sukhi Chahal Death: अमेरिकेत खलिस्तानी विरोधक सुखी चहल यांचा गूढ मृत्यू ; प्रकरणाची सखोल चौकशी सुरु