Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील ‘या’ देशात सापडली 8 हजार वर्षांपूर्वीची रहस्यमय आकृती; एलियन अस्तिवाचा पुरावा?

एलियन हा विषय नेहमीच मानवासाठी कुतूहलाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आत्तापर्यंत अनेकठिकाणी एलियन्स अवशेष सापडेले, तर कोणी युएफओ पाहिल्याचे अनेक घटना समोर आल्या. मात्र, याबाबत ठोस काही पुरावे अद्याप सापडलेले नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 09, 2025 | 10:33 AM
जगातील 'या' देशात सापडली 8 हजार वर्षांपूर्वीची रहस्यमय आकृती; एलियन अस्तिवाचा पुरावा?

जगातील 'या' देशात सापडली 8 हजार वर्षांपूर्वीची रहस्यमय आकृती; एलियन अस्तिवाचा पुरावा?

Follow Us
Close
Follow Us:

कुवैत: एलियन हा विषय नेहमीच मानवासाठी कुतूहलाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आत्तापर्यंत अनेकठिकाणी एलियन्स अवशेष सापडेले, तर कोणी युएफओ पाहिल्याचे अनेक घटना समोर आल्या. मात्र, याबाबत ठोस काही पुरावे अद्याप सापडलेले नाही. सध्या कुवैतमधील सुबिया भागात उत्खननादरम्यान सापडलेली एक रहस्यमय आणि प्राचीन मातीची बनवलेली मानवाकृती खूप चर्चेत आली आहे. या मूर्तीचा संबंध एलिन्सशी असल्याचे म्हटले जात आहे.

तज्ञांनी दावा केला आहे की, ही आकृती सुमारे 8000 वर्षे जुनी आहे. वारसॉ विद्यापीठ आणि कुवैती-पोलिश ऐतिहासिक मिशनने दिलेल्या माहितीनुसार, ही कलाकृती बहरा-1 नावाच्या पुरातत्वीय स्थळावर सापडली आहे, जे अरब प्रायद्वीपातील सर्वात प्राचीन आणि मोठ्या वसाहतींपैकी एक मानले जाते. मात्र याचा संबंध एलिन्सशी जोडला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नवाज शरीफ यांच्या मुलीच्या ‘त्या’ कृत्याने पाकिस्तानात गोंधळ; होतयं जबरदस्त ट्रोल, नेमकं घडलं काय?

प्राचीन उबैद संस्कृतीशी संबंध

असे मानलेजात आहे की, ही आकृती प्राचीन मेसोपोटामियाच्या उबैद संस्कृतीशी संबंधित असून, ही कांस्ययुगापूर्वीची असल्याचे म्हटले आहे. पुरातत्वतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही मूर्ती सुमारे सहाव्या सहस्रक ईसा पूर्वकाळात तयार करण्यात आली होती. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची लांबट खोपडी, तिरक्या डोळ्यांची रचना, आणि चपट्या नाकाचा आकार. या विशिष्ट लक्षणांमुळे ती त्या काळातील अन्य उबैद मूर्तींपेक्षा पूर्णपणे वेगळी वाटते.

एलियनशी संबंधाबाबत अंदाज

ही मूर्ती एलियनशी संबंधित असल्याच्या अंदाज अनेक लोकांनी लावला आहेत. काहींच्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही कलाकृती एलियन्सचा पुरावा असू शकते आणि यामुळे हे सिद्ध होईल की सात ते आठ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचे अस्तित्व होते. मात्र, या दाव्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

बहरा स्थळावर सापडली मूर्ती

बहरा-1 स्थळ हे अरब नवपाषाण संस्कृती आणि प्राचीन मेसोपोटामिया व अनातोलिया यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण समजण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. येथे प्राचीन मातीच्या भांड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. उत्खननादरम्यान सापडलेल्या भांड्यांमध्ये वनस्पतींचे पुरावे मिळाले आहेत, जे या क्षेत्रातील प्राचीन सभ्यतेबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकतात.

पुरातत्त्वतज्ज्ञांचे मत

डॉ. रोमन होवसेपियन यांनी या शोधाबाबत सांगितले की, प्राथमिक विश्लेषणात स्थानिक मातीच्या भांड्यांमध्ये जंगली वनस्पतींचे चिन्ह आढळले आहेत. हे पुरावे बहरा-1 स्थळाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला अधिक अधोरेखित करतात. या क्षेत्रातील शोधांमुळे प्राचीन काळातील संस्कृतींच्या देवाणघेवाण प्रक्रियेला नवीन दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे. 8000 वर्षे जुन्या या आकृतीने प्राचीन संस्कृती, कला, आणि संभवित एलियन अस्तित्वाबद्दल अनेक प्रश्न उभे केले आहेत. जरी हे दावे सिद्ध होण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असली, तरी या शोधामुळे मानवाच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाला नवीन दिशा मिळाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ इटालियन जर्नलिस्टची इराणी तुरुंगातून सुटका; जॉर्जिया मेलोनी यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच परतणार मायदेशी

Web Title: Mysterious figure from 8 thousand years ago found in kuwait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण
1

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा
2

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी
3

मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
4

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.