
Asim Munir Daughter Marrige
अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका
असीम मुनीरची कन्या महनूर हिचे लग्न तिचा चुलत भाऊ अब्दुल रहमान म्हणजेच मुनीर यांच्या पुतण्याशी झाले आहे. यामुळे सध्या या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. भाऊच बनला नवरा अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. तसेच विवाहसोहळा गुप्तपणे पार का पडला असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. रावळपिंडी येथील पाकिस्तानच्या आर्मी हेडक्टार्ट्समध्ये हा सोहळा पार पडला. या विवाहाचे कोणतेही अधिकृत फोटो जाहीर करण्यात आलेले नाहीत. तसेच हा लो-प्रोफाइल सोहळा ठेवण्यात आला होता.
गेल्या काही काळात पाकिस्तान(Pakistan) मध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय आणि लष्करी अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुनीर यांनी कन्येचे लग्न लो-प्रोफाइल ठेवले असल्याचे म्हटले आहे. या सोहळ्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशाक दार, आएसआय प्रमुख, तसेच काही वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. अंदाजे 40 पाहुण्यांना या लग्नसोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचा गाजावाज न करत हे लग्न पार पडले.
अब्दुल रहमान हा असीम मुनीरचा पुतण्या असून तो पाकिस्तान लष्करात कॅप्टन म्हणून होतचा. त्याला सैन्य अधिकाऱ्यांच्या राखीव कोट्यातून सिव्हिलमध्ये प्रवेश मिलाला हगोता. सध्या अब्दुल रहमान असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत आहे. असीम मुनीर यांना चार मुली असून महनूर ही त्यांची तिसरी कन्या आहे.
सध्या पाकिस्तानचे लष्कर असीम मुनीर यांच्या नेतृत्त्वाखाली आहे. परंतु पाकिस्तानमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखील धार्मिक अस्थिरतेते मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटले आहे. ग्रीक सिटी टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या धार्मिक कट्टरतेमुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराषट्रीय स्तरावर याचा तीव्र निषेध केला जात आहे. पाकिस्तानमध्ये नागरिकांचे संरक्षण धोक्यात आले आहे. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यांवर याचा परिणाम होत असून पाकिस्तानवर तीव्र टीका केली जात आहे.
पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल
Ans: असीम मुनीरच्या कन्येचा विवाह सोहळा रावळपिंडी येथील पाकिस्तानच्या आर्मी हेडक्टार्ट्समध्ये 26 डिसेंबर 2025 रोजी पार पडला आहे.
Ans: पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय आणि लष्करी अस्थिरता निर्माण झाली आहे, यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव असीम मुनीरच्या मुलीचे लग्न गुप्तपणे पार पडले आहे.
Ans: असीम मुनीरचा जावई हा त्याचाच पुतण्या असून तो पाकिस्तानमध्ये कमिशन असिस्टंट म्हणून कार्यरत आहे.