सेसिलिया साला इटालियन जर्नलिस्टची इराणी तुरुंगातून सुटका; जॉर्जिया मेलोनी यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच परतणार मायदेशी(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रोम: इराणच्या इविन तुरुंगांतून सुटका झाल्यानंतर आता इटालियनपत्रकार सेसिलिया साला आता मायदेशी परतत आहेत. त्यांच्या सुटका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. 29 वर्षीय सेसिलिया साला 19 डिसेंबर रोजी तेहरानमध्ये पत्रकार म्हणून अधिकृत व्हिसासह काम करत असताना अटक झाली होती. त्यांना सुमारे दोन आठवडे एकांतवासात ठेवण्यात आले होते. त्यानंतर इटलीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या सुटकेसाठी इराणच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती.
माल्पेंसा यांना अटक
सेसिलिया साला यांना अटक होण्याच्या तीन दिवस आधी इराणी व्यापारी मोहम्मद अबेदिनी यांना इटलीतील मिलानच्या माल्पेंसा विमानतळावर अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या आदेशानुसार झालेल्या या अटकेचा अबेदिनी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी 2024 मध्ये जॉर्डनमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यासाठी सुटे भाग पुरवले होते. या हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. साला यांच्या अटकेचा अबेदिनी प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.
मेलोनी यांची सोशल मीडिया पोस्ट
पंतप्रधान मेलोनी यांनी साला यांच्या सुटकेची माहिती बुधवारी(दि. 8 जानेवारी) जाहीर केली. त्यांनी सांगितले की, इटलीच्या कूटनीतिक आणि गुप्तचर विभागांनी यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. मेलोनी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधित पोस्ट लिहिलताना म्हटले की, “सेसिलिया साला मायदेशी परत येत आहेत. त्यांची सुटका झाल्याचे त्यांच्या पालकांना कळवण्यात मला खूप आनंद झाला.”
È in volo l’aereo che riporta a casa Cecilia Sala da Teheran.
Grazie a un intenso lavoro sui canali diplomatici e di intelligence, la nostra connazionale è stata rilasciata dalle autorità iraniane e sta rientrando in Italia. Ho informato personalmente i genitori della giornalista…— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) January 8, 2025
पत्रकारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
इराणच्या ईविन तुरुंगात साला यांच्या अटकेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. हा तुरुंग राजकीय कैद्यांसाठी आणि विदेशी नागरिकांसाठी प्रसिद्ध असून, येथे अनेकांना जाचक परिस्थितीत ठेवले जाते. अलीकडच्या काळात इराणमध्ये परदेशी नागरिक आणि द्वैतराष्ट्रीय व्यक्तींना अटक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे की, इराण अशा अटकांचा वापर राजकीय तोडपाणी साधण्यासाठी करतो. मात्र, इराणने हे आरोप फेटाळले आहेत.
इटलीसाठी आनंदाचा क्षण
सेसिलिया साला यांच्या सुटकेने पंतप्रधान मेलोनी यांच्या नेतृत्वाखाली इटलीच्या कूटनीतीचे यश अधोरेखित केले आहे. परंतु, यासोबतच अशा असुरक्षित ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. सेसिलिया साला यांची सुखरूप परतफेड हा इटलीसाठी आनंदाचा क्षण आहे. त्याच वेळी, त्यांनी पत्रकारांना होणाऱ्या धोक्यांची आणि त्यांच्यासाठी अधिक सुरक्षिततेची गरज अधोरेखित केली आहे.