Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crew11: अंतराळात आणीबाणी! 25 वर्षांत पहिल्यांदाच NASAने अर्धवट सोडली मोहीम; अंतराळवीरांना तातडीने पृथ्वीवर आणले जाणार

NASA : अमेरिका, जपान आणि रशियाचे अंतराळवीर मिशन Crew11 वर एकत्र काम करत आहेत. हे अंतराळवीर तिथे महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग करत आहेत, पण आता त्यांना परतावे लागेल, पहिल्यांदाच.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 10, 2026 | 03:38 PM
nasa iss crew 11 medical evacuation first time history astronaut return 2026

nasa iss crew 11 medical evacuation first time history astronaut return 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • इतिहासात पहिल्यांदाच
  • नियंत्रित वैद्यकीय सुटका
  • कोण आहेत हे अंतराळवीर?

NASA Crew-11 medical evacuation 2026 : विज्ञानाच्या जगात आज एक अशी घटना घडली आहे जिने संपूर्ण जगाचे लक्ष अंतराळाकडे वेधले आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) आपल्या ‘क्रू-११’ (Crew-11) मोहिमेतील चार अंतराळवीरांना मोहिमेच्या मध्यभागीच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) परत बोलावणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या वैद्यकीय कारणामुळे संपूर्ण मोहीम रद्द करण्याची वेळ नासावर आली आहे.

काय घडली नक्की घटना?

नासाचे प्रशासक जेरेड इसाकमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रू-११ मधील एका सदस्याला गंभीर वैद्यकीय समस्येचा सामना करावा लागत आहे. ७ जानेवारी रोजी जेव्हा नासाने नवीन वर्षाचा पहिला ‘स्पेसवॉक’ अचानक रद्द केला, तेव्हाच काहीतरी अघटित घडल्याची चर्चा सुरू झाली होती. ८ जानेवारीच्या रात्री उशिरा नासाने स्पष्ट केले की, अंतराळवीराची प्रकृती स्थिर असली तरी, अंतराळ स्थानकात उपचारांच्या मर्यादेमुळे त्यांना पृथ्वीवर आणणे आवश्यक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट

बर्फाळ अंतराळात उपचारांच्या मर्यादा

नासाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जेम्स पोल्क यांनी स्पष्ट केले की, “आयएसएसवर आमच्याकडे प्राथमिक उपचारांची सर्व साधने आहेत, परंतु एखाद्या गंभीर आजाराचे अचूक निदान (Diagnosis) करण्यासाठी लागणारी मोठी यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात (Microgravity) राहिल्याने शरीरावर होणारे परिणाम काही वेळा गुंतागुंतीचे ठरतात, म्हणून आम्ही जोखीम न पत्करता हा निर्णय घेतला आहे.”

NASA has decided to bring the entire SpaceX Crew-11 mission crew back to Earth earlier than planned due to a medical issue with one of the astronauts.This is the first controlled medical evacuation (not an emergency, but precautionary) in the 25-year history of the International… pic.twitter.com/eI9gUXzSYf — Black Hole (@konstructivizm) January 9, 2026

credit : social media and Twitter

परतीचा प्रवास: १४ जानेवारीचा मुहूर्त

क्रू-११ चे चार सदस्य माईक फिन्के, जेना कार्डमन, किमिया युई आणि ओलेग प्लॅटोनोव्ह आता १४ जानेवारी २०२६ रोजी ‘स्पेसएक्स ड्रॅगन’ कॅप्सूलमधून पृथ्वीकडे झेपावतील. १५ जानेवारी रोजी पहाटे कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यावर हे विमान उतरण्याची शक्यता आहे. हे अंतराळवीर ऑगस्ट २०२५ पासून अंतराळात होते आणि त्यांची मोहीम फेब्रुवारीच्या अखेरीस संपणार होती, मात्र एका महिना आधीच त्यांना परतावे लागत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: आता तिसरे महायुद्ध अटळ? पुतिन यांचा ‘Oreshnik’ प्रहार; पोलंड सीमेवर स्फोट, युक्रेन तर फक्त निमित्त पण NATO निशाण्यावर

पुढील नियोजन: क्रू-१२ ची तयारी

या आपत्कालीन परिस्थितीमुळे नासा आता ‘क्रू-१२’ ची मोहीम नियोजित वेळेच्या आधीच राबवण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून अंतराळ स्थानकातील वैज्ञानिक प्रयोगांवर कोणताही परिणाम होणार नाही. दरम्यान, आयएसएसवर सध्या असलेले इतर तीन अंतराळवीर (ख्रिस विल्यम्स, सर्गेई मिकाएव आणि सर्गेई कुड-स्वेर्कोव्ह) तिथेच राहून पुढील कामाची धुरा सांभाळतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नासाने अंतराळवीरांना लवकर परत का बोलावले?

    Ans: क्रू-११ मधील एका अंतराळवीराला गंभीर वैद्यकीय समस्येचा सामना करावा लागला असून, अंतराळात उपचारांच्या पुरेशा सोयी नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

  • Que: कोणत्या अंतराळवीराची प्रकृती बिघडली आहे?

    Ans: वैद्यकीय गोपनियतेच्या नियमांनुसार नासाने अद्याप त्या विशिष्ट अंतराळवीराचे नाव किंवा आजाराचे स्वरूप उघड केलेले नाही.

  • Que: हे अंतराळवीर पृथ्वीवर कधी पोहोचतील?

    Ans: नासाने १४ जानेवारी २०२६ रोजी 'अनडॉकिंग' आणि १५ जानेवारी रोजी सकाळी 'स्प्लॅशडाउन' (समुद्रात उतरण्याचे) नियोजन केले आहे.

Web Title: Nasa iss crew 11 medical evacuation first time history astronaut return 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • NASA
  • NASA Space Agency
  • Space News

संबंधित बातम्या

Jupiter Opposition : उघड्या डोळ्यांनी गुरू ग्रहाला पाहण्याची यंदा मिळणार संधी; आकाशात घडतंय महाकाय ‘गुरू’ दर्शन
1

Jupiter Opposition : उघड्या डोळ्यांनी गुरू ग्रहाला पाहण्याची यंदा मिळणार संधी; आकाशात घडतंय महाकाय ‘गुरू’ दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.