
nasa moon mission 2032 human settlement south pole china competition 2026
NASA Moon Mission 2030 Roadmap : विज्ञान कल्पनेतील गोष्टी आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) आता केवळ चंद्रावर जाऊन परत येण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर चंद्राला मानवाचे दुसरे घर बनवण्याच्या मोहिमेत गुंतली आहे. नासाने आपल्या आगामी ऐतिहासिक चंद्र मोहिमेचा संपूर्ण कृती आराखडा जाहीर केला आहे. या योजनेअंतर्गत, २०३२ पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) मानवी वस्ती स्थापन करण्याचे नासाचे लक्ष्य आहे. यासाठी रोबोटिक लँडर्स, प्रगत ड्रोन आणि अत्याधुनिक वाहनांची फौज चंद्रावर पाठवली जाणार आहे. ‘आता आम्ही पुन्हा कधीही चंद्र सोडणार नाही,’ अशी घोषणा करून नासाचे प्रमुख जेरेड आयझॅकमन यांनी जगाला चकित केले आहे.
नासाची ही महत्त्वाकांक्षी मोहीम अत्यंत पद्धतशीरपणे तीन वेगवेगळ्या टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, रोबोटिक लँडर्स आणि अत्याधुनिक ड्रोन चंद्राच्या दुर्गम पृष्ठभागाचा नकाशा तयार करतील. यामध्ये ॲस्ट्रोबोटिक्सचे ‘ग्रिफिन-१’ लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील ‘नोबिले क्रेटर’ या विवरात उतरवले जाईल. हे लँडर हाय-रिझोल्यूशन कॅमेरे आणि लेझर तंत्रज्ञानाने सज्ज असेल, जेणेकरून भविष्यातील अंतराळवीरांसाठी मालवाहतूक करणारी वाहने सुरक्षितपणे उतरवता येतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Space Warfare: 6,000 किमी प्रतितास वेग अन् लेझर वेपन्स! रशियाचे ‘हे’ अदृश्य विमान अन् जागतिक डिफेन्स प्रोजेक्टचे सत्य काय?
दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी केली जाईल. २०२९ पर्यंत नासाने एकूण २५ अवकाश प्रक्षेपणांचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्याद्वारे चंद्रावर सुमारे ४ मेट्रिक टन वजनाचा अवजड माल आणि उपकरणे पोहोचवली जातील. यानंतर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात, तिथे अणुभट्ट्या (Nuclear Reactors) आणि सौर ऊर्जा प्रणाली स्थापित केल्या जातील, ज्यामुळे २०३२ पर्यंत मानवाला तिथे वीज आणि ऊर्जेचा तुटवडा भासणार नाही आणि एक अर्ध-कायमस्वरूपी वसाहत तयार होईल.
🚨 NASA unveiled plans for a permanent Moon Base near the lunar South Pole 🌕 Phase 1 (2026-2029): Heavy robotic missions and commercial payload deliveries Phase 2 (2029 – 2032): Semi-permanent lunar infrastructure, including surface power systems, rovers, and drones •… pic.twitter.com/UxxP9kMyjq — Latest in space (@latestinspace) May 26, 2026
credit – social media and Twitter
या महाकाय मोहिमेत नासा एकटी नसून, तिने अमेरिकेतील आघाडीच्या खाजगी अंतराळ कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये ‘इंट्युटिव्ह मशीन्स’, ‘ॲस्ट्रोबोटिक’ आणि ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ या कंपन्यांचा समावेश आहे. ब्लू ओरिजिन कंपनी या मोहिमेसाठी ‘एंड्युरन्स’ नावाचे एक विशेष आणि अत्याधुनिक चंद्रयान तयार करत आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चालू कार्यकाळ संपण्यापूर्वी, म्हणजेच २०२९ पर्यंत, अमेरिकन अंतराळवीरांना पुन्हा एकदा चंद्राच्या भूमीवर उतरवण्याची वॉशिंग्टनची योजना आहे.
The near impossible is becoming possible. We are building toward a sustained human presence at the lunar South Pole. It begins with Phase 1: CLPS landers and LTV rovers testing the “science of survival” on the lunar surface before heavy HLS cargo landers deliver the mass and… pic.twitter.com/EhqmXAPQzA — NASA Administrator Jared Isaacman (@NASAAdmin) May 26, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FRCVProject: रशिया फेडणार भारताचे कर्ज! भारतीय लष्कराच्या 3600 रणगाड्यांचे होणार ‘महाबली’त रूपांतर, ‘असा’ आहे प्लॅन
अंतराळातील या महासत्तेच्या शर्यतीत चीन अमेरिकेला तगडी टक्कर देत आहे. चीननेही स्वतःचा २०३० चा रोडमॅप जाहीर केला असून त्याआधीच चंद्रावर मानव पाठवण्याची त्यांची तयारी आहे. नुकतेच चीनने आपले ‘शेनझोऊ-२३’ (Shenzhou-23) मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित करून ‘तियांगोंग’ अंतराळ स्थानकावर आपले अंतराळवीर पाठवले आहेत. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील अंतराळ युद्ध आता एका रंजक वळणावर आले असून, कोण आधी चंद्रावर स्वतःचा झेंडा कायमचा रोवणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
सर्वच देशांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच आपली वस्ती का उभी करायची आहे, यामागे एक मोठे वैज्ञानिक कारण आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील अंधाऱ्या विवरांमध्ये अब्जावधी टनांचा गोठलेला बर्फ (Water Ice) असण्याची दाट शक्यता आहे. जर हा बर्फ वितळवून प्रक्रिया केली, तर मानवाला पिण्यासाठी शुद्ध पाणी, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रॉकेटसाठी लागणारे हायड्रोजन इंधन चंद्रावरच तयार करता येईल. यामुळे मंगळ ग्रहावरील पुढील मोहिमा सोप्या होतील. तथापि, चंद्रावरील उणे तापमानात मानवाला सुरक्षित ठेवणे आणि ही अंतिम मुदत पाळणे नासासाठी एक अग्निपरीक्षा असणार आहे.