Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News: भारताच्या नादी लागू नका…; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा सरकारला घरचा आहेर

भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती शाहबाज शरीफ यांनी रविवारी पीएमएल-एनचे अध्यक्ष नवाज शरीफ यांना दिली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 28, 2025 | 03:55 PM
Pakistan News: भारताच्या नादी लागू नका…;  पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा सरकारला घरचा आहेर
Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानातही एकप्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक केले होते. यावेळीही भारत अशी पावले उचलू शकते, या भितीने पाकिस्तानी सैन्यात भितीचे वातावरण आहे. याच भितीतून पाकिस्तानी राज्यकर्ते थेट भारताला युद्धाची धमकीही देताना दिसत ​​आहेत. पण यात सर्वात जास्त चिंताग्रस्त व्यक्ती म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, त्यांची निराशा त्यांच्या विधानांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

याच दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचे भाऊ आणि पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारताच्या नादी लागू नका आणि अडचणीत येऊ नका असा सल्ला दिला आहे. एका पाकिस्तानी वृत्तानुसार, नवाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधांमधील कटुता राजनैतिक मार्गाने दूर करण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानने भारतासोबत युद्ध करणे चांगले होणार नाही, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे नवाज शरीफ यांचा हा सल्ला पाकिस्तानातील परिस्थितीचे स्पष्ट संकेत आहे.

आता काय पाकिस्तानचं खरं नाही! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती शाहबाज शरीफ यांनी रविवारी पीएमएल-एनचे अध्यक्ष नवाज शरीफ यांना दिली. भारतातील काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे निलंबन करण्यात आले. शाहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना त्यांच्या जती उमरा येथील निवासस्थानी बोलावून ही माहिती दिली, ज्यामध्ये पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज देखील उपस्थित होत्या.

नवाज शरीफ काय म्हणाले?

भारतावर संतापलेल्या शाहबाज शरीफ यांनीसंतापाच्य भरातच पाकिस्तान कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. भारताला याचे योग्य उत्तर दिले जाईल. यावर नवाज शरीफ यांनी शाहबाज यांना भारतासोबत वाद घालू नका असा सल्ला दिला आहे. भारतासोबत युद्धाची शक्यता टाळण्यासाठी त्यांच्या सरकारने युद्धाऐवजी सर्व राजनैतिक संसाधनांचा वापर करावा अशी त्यांची इच्छा आहे, असे नवाज म्हणाले. कारण युद्ध पाकिस्तानसाठी चांगले होणार नाही.

भारताच्या कृतीने पाकिस्तानला धक्का

यापूर्वी, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक आंतरराष्ट्रीय आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये अमेरिका, इराण, चीन, रशिया आणि ब्रिटनचे अधिकारी असतील. ते म्हणतात की पाकिस्तान या आयोगासमोर पहलगाम हल्ल्याचे सत्य बाहेर आणेल. मात्र, यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Web Title: Nawaz sharif news dont listen to indias advice nawaz sharifs advice to the pakistan government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • nawaz Sharif
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री
1

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.