भारत फ्रान्सकडून खरेदी करणार (फोटो- istockphoto)
नवी दिल्ली: टीआरएफ या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन भारताने पाकिस्तानची कोंडी केली आहे. पहालगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दरम्यान आज भारत फ्रांस सरकारसोबत एक महत्वाचा करार करणार आहे.
भारत सरकार आज दिल्लीमध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीचा 63 हजार कोटींचा खरेदी करार करणार आहे. यावेळेस भारतीय संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि दोन्ही देशांचे राजदूत उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार फ्रान्स सरकारकडून 26 राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. राफेल एम जेट्स ही आयएनएस विक्रांतवर सज्ज देशसेवेसाठी सज्ज असणार आहे. ही लढाऊ विमाने मिग -29 लढाऊ विमानांची मदत करणार आहेत.
सध्या भारतीय वायु सेनेत 36 राफेल लढाऊ विमानांचा ताफा आहे. आज नवी दिल्लीत राफेल लढाऊ विमानांचा करार होणार आहे. या नवीन करारानंतर भारतीय वायुसेनेत राफेल लढाऊ विमानांची संख्या 62 इतकी होणार आहे. सध्या 36 राफेल लढाऊ विमाने ही अंबाला आणि हासिमरा येथे तैनात आहेत. भारत सरकार खास करून आयएनएस विक्रांतसाठी 36 राफेल मरीन लढाऊ विमाने खरेदी करणार आहे.
इंडियन आर्मीला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठे यश
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कर आणि उग्रवादी यांच्यात मोठी चकमक झाली आहे. यावेळी भारतीय लष्कराने तीन उग्रवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यातच एका अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका देखील केली आहे.
भारतीय लष्कराने ठार मारलेल्या तीन उग्रवाद्यांची ओळख पटली आहे. सर्व उग्रवादी हे नॅशनल सोशलिस्ट ऑफ काऊन्सिल ऑफ नागालँड ग्रुपचे सदस्य आहेत. भारतीय लष्कराकडून या ऑपरेशनची माहिती देण्यात आली. या ऑपरेशनमध्ये इंडियन आर्मी, आसाम रायफल्स आणि जिल्हा पोलिस दल सहभागी झाले होते. पहालगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर आणि सीमावर्ती भागात हे ऑपरेशन राबवले जात आहे.
पहलगाम हल्ल्यात चीनचा सहभाग…?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील गुप्तचर यंत्रणांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून या घटनेचा तपास केला जात आहे. या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेच्या तपासांतर्गत तपास यंत्रणांना चीनच्या एका संशयास्पद सॅटेलाईट फोनचा मागोवा लागला आहे. तपास यंत्रणांना चीनच्या एका ‘हुआवेई सॅटेलाइट फोन’चा तपास लागला आहे. पहलगाम हल्ल्यावेळी हा फोन घटनास्थळावर होता, अशी माहिती समोर आली आहे.