India-US Trade Deal: बजेटनंतरचा सर्वात मोठा धमाका! भारत-अमेरिका जारी करणार संयुक्त निवेदन; पियुष गोयल यांनी सांगितली 'ती' तारीख ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
India US Trade Deal 2026 Piyush Goyal : भारत आणि अमेरिका (India-US Trade Deal) यांच्यातील व्यापाराच्या दृष्टिकोनातून एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला आणि चर्चेत असलेला ‘भारत-अमेरिका व्यापार करार’ (BTA) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दोन्ही देशांच्या वतीने एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले जाईल आणि मार्चच्या मध्यापर्यंत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली जाईल. या करारामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले ५०% आयात शुल्क आता केवळ १८ टक्क्यांवर येणार आहे.
नवी दिल्ली येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर पियुष गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आमच्या दोन्ही देशांच्या नेत्यांनी (पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प) या करारावर सहमती दर्शवली आहे. व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्णपणे तयार असून येत्या ४ ते ५ दिवसांत किंवा त्यापूर्वीही भारत आणि अमेरिका संयुक्त निवेदन जारी करतील.” हे निवेदन जारी झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत अमेरिका शुल्क कपातीचा कार्यकारी आदेश जारी करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : End FGM : बापरे! अंगावर काटा आणणारी प्रथा; पाहा काय आहे ‘महिला जननेंद्रियांची विकृती’ आणि का आवश्यक आहे त्याविरुद्ध लढा
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या कारणावरून भारतावर २५% परस्पर शुल्क आणि २५% दंडात्मक शुल्क लादले होते. हे एकूण ५०% शुल्क आता १८% पर्यंत कमी केले जाणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा भारताच्या ३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या निर्यातीला होणार आहे. विशेषतः कापड (Textiles), तयार कपडे (Garments), चामड्याचे उत्पादने, पादत्राणे आणि सागरी उत्पादने यांसारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) जागतिक बाजारपेठेत मोठी उभारी मिळणार आहे.
BREAKING: Historic statement by Commerce Minister Piyush Goyal in Parliament! India’s core sensitivities in food & agriculture fully safeguarded in the India-US trade deal. Farmers and dairy interests remain untouched. US tariffs slashed from 50% to 18%—boost for textiles,… pic.twitter.com/NUEJLd5BIX — Aditya Kumar Trivedi (@adityasvlogs) February 4, 2026
credit – social media and Twitter
हे देखील वाचा : भारतातील ‘त्या’ डॉक्टर ज्यांनी पुरुषप्रधान काळात गाजवले वैद्यकीय क्षेत्र; आज प्रत्येक महिलांसाठी आहेत प्रेरणास्थान
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, “नेतृत्व पातळीवर सहमती झाल्यानंतर संयुक्त निवेदन काढणे ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. एकदा हे निवेदन प्रसिद्ध झाले की, त्याचे रूपांतर कायदेशीर करारात केले जाईल.” अमेरिकेत शुल्क कपातीचा निर्णय कार्यकारी आदेशाद्वारे (Executive Order) जलद गतीने घेता येतो, त्यामुळे तिथली अंमलबजावणी लवकर होईल. मात्र, भारताची टॅरिफ कपात ही मार्चच्या मध्यावर अधिकृत स्वाक्षरी झाल्यानंतरच अंमलात येईल, कारण भारताची आयात शुल्क प्रणाली ही ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (MFN) नियमांतर्गत नियंत्रित केली जाते.
Ans: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या माहितीनुसार, मार्च २०२६ च्या मध्यापर्यंत या करारावर औपचारिक स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.
Ans: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेले एकूण ५०% शुल्क (२५% टॅरिफ + २५% दंड) १८% पर्यंत कमी केले जाईल.
Ans: कापड, तयार कपडे, चामड्याचे वस्तू, सागरी उत्पादने आणि लघु उद्योगांशी (MSME) संबंधित क्षेत्रांना याचा थेट फायदा होईल.






