Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेपाळमध्ये ५ मार्च २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडतील. सध्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान काठमांडूचे महापौर बालेन शाह पंतप्रधान पदाच्या शर्यताती उतरले आहे. रविवारी (२८ डिसेंबर) त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्यात आले. बालेन शाह आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) ५ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुका एकत्र लढवण्याचा करार केला आहे. यानुसार बालेन यांचा गट निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या RSP च्या चिन्हावर निवडणूक लढलणार आहेत. यानंतर बालेवनच्या संघाचे RSP मध्ये विलीनीकरण होणार आहे. केवळ पक्षाचे नाव, ध्वज आणि चिन्ह अपरिवर्तित राहील असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान रविवारी (२८ डिसेंबर) दोन प्रमुख मधेशी पक्षांचे विलीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. महंत ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालीली जनता समावादी पक्ष (JSP) आणि उपेंद्र यादव यांच्या नेतृत्त्वाखालील लोकतांत्रिक समाजवादी पक्ष(LSP)यांचे एकत्रिकरण झाले आहे. दोन्ही पक्षांनी संघीय लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी निवेदनावर स्वाक्षरी करत म्हटले की, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय हा संघराज्यवाद, ओळख, प्रमाणबद्ध प्रणीवर आधिरित घेण्यात आला आहे. याचा उद्देश देशात समावेशकता आणि सामाजिक न्यायांना बळकटी देणे आहे. पक्षासंबंधित आवश्कय औपचारिकतेची प्रक्रिया लवकरच पूर्ण केल्या जातील असे JSP आणि LSP ने म्हटले आहे.
नेपाळच्या निवडणुका नेपाळसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाई राजकारणासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. यामध्ये पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी नेपाळ निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण चार आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्था करणार आहेत.
Ans: नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुका ५ मार्च २०२६ रोजी होणार आहेत.
Ans: नेपाळमध्ये दोन प्रमुख मधेशी पक्ष जनता समावादी पक्ष (JSP) आणि लोकतांत्रिक समाजवादी पक्ष(LSP)यांचे एकत्रिकरण झाले आहे.
Ans: नेपाळच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीसाठी काठमांडूचे महापौर बालेन शाह यांची निवड करण्यात आली आहे.






