नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Birgunj Violent Protests: मशिदीवरील हल्ल्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी; रक्सौल सीमा बंद
नेपाळमध्ये ०५ मार्च २०२६ ला सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. नेपाळचे चार प्रमुख पक्ष नेपाळी काँग्रेस, UML, प्रचंड CPN आणि समाजवादी नेपाळ एकत्रित येण्याची योजना आखत आहे. हे चार पक्ष नेपाळच्या काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्याविरोधात एकत्र आले आहे. नुकतेच नेपाळच्या RSP पक्षाने आणि बालेन शाहने निवडणुक लढवण्यासाठी युती केली होती. दरम्यान या युतीला हे चार पक्ष टक्कर देण्यासाठी मैदानात उतरु शकतात.
मार्चमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी नेपाळच्या काठमांडूचे महापौर बालेन शाह आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) ५ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुका एकत्र लढवण्याचा करार केला आहे. यालाच विरोध म्हणून बालेन शाह यांना पराभूत करण्यासाठी नेपाळचे चार प्रमुख राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकासाठी युती करण्याच्या तयारीत आहे. सध्या या दोन्ही युतींची जगभर चर्चा सुरु आहे. यामागचे कारण म्हणजे बालेन शाह हे चीन समर्थित नेते मानले जाते.
तसे पाहायला गेले तर बालेन शाह यांनी चीनच्या कार्यपद्धतीवर नेहमी टीका केली आहे. चीनने जारी केलेल्या नकाशात नेपाळमध्ये लिपुलेख आणि कालापाणी न दर्शवल्यामुळे चीनचा दौरा रद्द करत यावर तीव्र टीका केली होती, परंतु काही तज्ज्ञांच्या मते, बालेन शाह यांनी भारताच्या धोरणांवर आणि चित्रपट प्रदर्शनांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. ही भूमिका चीनसाठी नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी अनुकूल ठरु शकते. परंतु अद्याप ते चीनचे समर्थन करतात असा कोणताही ठोस पुरावा किंवा उदाहरण नाही. बालेन शाह स्वत:ला नेपाळी राष्ट्रवादी म्हणून संबोधतात.
दरम्यान बालेन शाह यांना रोखण्यासाठी नेपाळी काँग्रेस, UML, प्रचंड CPN आणि समाजवादी नेपाळ हे चार पक्ष युतीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हे चार पक्ष एकत्रित आले तर बालेन शाह यांच्यापुढे अनेक आव्हाने निर्माण होऊ शकते. या पक्षांमध्ये जनरेशन झेडच्या तरुणांचा समावेश वाढत आहे. ज्याचा परिणाम नेपाळच्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ही युती बालेन शाह यांच्याविरोधात प्रभावी ठरु शकते. परंतु ही युतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. या चार पक्षांची युती नेपाळमध्ये भारतावर आणि चीनवर नेमका काय प्रभाव पाडेल हे पाहणे सध्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार






