Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood : ‘फोनचे शेवटचे लोकेशन हीच शेवटची आशा…’; नेपाळमधील महापुरांनंतर बेपत्ता झालेल्या प्रियजनांचा ‘असा’ घेतला जातोय शोध

Nepal Flood : नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर, बेपत्ता झालेल्या लोकांची कुटुंबे त्यांच्या मोबाईल फोनच्या शेवटच्या लोकेशनचा वापर करून आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. अनेक पीडितांच्या शोधात फोनचे लोकेशन एक महत्त्वाचा सुगावा ठरले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 15, 2026 | 03:20 PM
Missing People In Nepal Flood Nepal Flood 2026

Missing People In Nepal Flood Nepal Flood 2026

Follow Us
Follow Us:
  • फोनचे लोकेशन बनले आशेचा किरण
  • भारतीय पर्यटकांचा शोध सुरू
  • नेपाळ-चीन सीमेवर भीषण विध्वंस

प्रकृतीचा कोप आणि निसर्गाचे रौद्ररूप काय असू शकते, याचा थरारक अनुभव नुकताच नेपाळ (Nepal Flood) आणि चीनच्या सीमावर्ती भागात पाहायला मिळाला. चीन-नेपाळ सीमेवर हिमनदीचा (Glacier) एक मोठा भाग अचानक फुटल्याने पर्वतांवरून प्रचंड प्रमाणात दगड, चिखल आणि ढिगाऱ्यांचा पूर खाली आला. या विनाशकारी जलप्रलयात संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला असून नेपाळमध्ये आतापर्यंत १,३८६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ५,१३० नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. सीमेच्या दुसऱ्या बाजूला चीनमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला असून ५१९ जण बेपत्ता आहेत. या महाभयंकर आपत्तीनंतर आता अनेक दिवस उलटले असून, आपल्या प्रियजनांपासून ताटातूट झालेली कुटुंबे अत्यंत हवालदिल झाली आहेत. अशा परिस्थितीत, बेपत्ता लोकांच्या मोबाईल फोनचे ‘शेवटचे लोकेशन’ (Last Phone Location) हे त्यांच्या नातेवाईकांसाठी आशेचा एकमेव आणि अत्यंत महत्त्वाचा किरण ठरत आहे.

या आपत्तीत बेपत्ता झालेल्यांमध्ये भारतातील हैदराबाद येथे कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय आरुषी गुप्ता यांचाही समावेश आहे. आरुषी कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेली होती. २३ ऑगस्ट रोजी दिल्लीहून काठमांडूला पोहोचल्यानंतर, ती २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-चीन सीमा ओलांडून तिबेटच्या दिशेने प्रवास करणार होती. पुराच्या दिवशी सकाळी, तिने तिचे वडील अजय गुप्ता यांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून कळवले होते की ती सीमेपासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यानंतर आरुषीने चायनीज इमिग्रेशन पोस्ट ‘ग्यिरोंग पोर्ट’चा एक फोटो आपल्या वडिलांना पाठवला. तोच तिचा शेवटचा मेसेज आणि फोटो ठरला. त्यानंतर तिच्या फोनवर केलेले अनेक कॉल्स आणि व्हॉट्सॲप मेसेज अनुत्तरित राहिले आहेत. आता तिच्या मोबाईलचे शेवटचे नेटवर्क लोकेशन आणि डिजिटल ट्रेसचा आधार घेऊन तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा

‘फाईंड माय’ ॲप अन् डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

आरुषीप्रमाणेच युक्रेनच्या ४२ वर्षीय एलेना याही या आध्यात्मिक यात्रेदरम्यान नेपाळ-चीन सीमेजवळ बेपत्ता झाल्या आहेत. नॉर्वेमध्ये राहणारी त्यांची मुलगी व्लादिस्लावा होर्लोवा रात्रंदिवस आपल्या आईचा डिजिटल सुगावा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. एलेना यांच्यासोबत प्रवास करणारे युक्रेनचे इतर ४६ नागरिकही या पुरानंतर बेपत्ता झाले आहेत. व्लादिस्लावाने तिच्या आयफोनमधील ‘फाईंड माय’ (Find My) ॲपचा वापर करून आईच्या उपकरणांचा शोध घेतला. यात तिचा मोबाईल फोन शेवटचा चीनच्या हद्दीत दाखवत होता, तर तिचे ॲपल वॉच (Apple Watch) आणि एअरपॉड्स नेपाळच्या हद्दीत शेवटचे सक्रिय असल्याचे दिसून आले. या लोकेशन डेटावरून पूर आला तेव्हा आई नेमकी कुठे असावी, याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न तिची मुलगी करत आहे.

भारतामध्येही बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि टेलीकॉम ऑपरेटर्सकडे मदतीची याचना केली आहे. पुण्यातील सचिन जोशी यांच्यासह अनेक नातेवाईकांनी भारतीय प्रशासनाला विनंती केली आहे की आंतरराष्ट्रीय मोबाईल ऑपरेटर्सकडून मोबाईलचे टॉवर लोकेशन आणि नेटवर्क डेटा मिळवून तातडीने शोधमोहीम राबवावी. अनेक तांत्रिक अडचणींमुळे अजूनही पुरेसा डेटा हाती आलेला नाही, परंतु कुटुंबीयांनी आशा सोडलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बोगद्यांतून सुटका अन् उंचावर आश्रयाची आशा

नेपाळमध्ये लष्कर आणि स्थानिक मदत यंत्रणांकडून अहोरात्र बचावकार्य सुरू आहे. नुकतेच एका जलविद्युत प्रकल्पाच्या (Hydroelectric Plant) पाण्याच्या बोगद्यात अडकलेल्या काही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेमुळे, बेपत्ता झालेले अनेक लोक पुराच्या पाण्यातून वाचून कुठल्यातरी उंच आणि सुरक्षित टेकडीवर किंवा गुहेत आश्रयाला गेले असतील, असा विश्वास त्यांच्या नातेवाईकांना वाटत आहे. याच आशेच्या जोरावर आरुषीचे वडील अजय गुप्ता आणि इतर भारतीय कुटुंबे आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी स्वतः नेपाळ व सीमावर्ती भागात जाण्याची तयारी करत आहेत.

Web Title: Nepal flood disaster missing people search using mobile last location

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • flood
  • nepal
  • Nepal Flash Flood
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : रशिया अन् युक्रेन दोन्ही देशांचे आपत्कालीन अलर्ट ॲप्स हॅक; अणुहल्ल्याच्या खोट्या सूचनांनी जगभरात घबराट
1

Russia Ukraine War : रशिया अन् युक्रेन दोन्ही देशांचे आपत्कालीन अलर्ट ॲप्स हॅक; अणुहल्ल्याच्या खोट्या सूचनांनी जगभरात घबराट

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO
2

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO

UK-India Ties : ‘गुलामगिरीबद्दल ब्रिटन भारताची माफी मागणार पण नुकसानभरपाई…’; पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे ऐतिहासिक विधान
3

UK-India Ties : ‘गुलामगिरीबद्दल ब्रिटन भारताची माफी मागणार पण नुकसानभरपाई…’; पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे ऐतिहासिक विधान

G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे
4

G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.