Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salary Policy : सरकारी कर्मचाऱ्यांना आता महिन्यातून दोनदा पगार मिळणार; नव्या सरकारचा मोठा निर्णय

Nepal News : नेपाळमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता महिन्यातून दोन वेळा पगार मिळणार आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 03:57 PM
Nepal Govt Employees to Get Paid Twice Monthly

Nepal Govt Employees to Get Paid Twice Monthly

Follow Us
Follow Us:
  • नेपाळच्या पगार नियमा मोठा बदल
  • आता महिन्यात दोनदा मिळणार पगार
  • बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय
Nepal Salary Policy : काठमांडू : नेपाळमध्ये मार्च २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयानंतर बालेन शाह (Balen Shah) यांचे सरकार ॲक्शन मोडमध्ये आहे. सरकार एकामागून एक अनेक धडाकेबाज निर्णय घेत आहे. माजी सरकारीमधील भ्रष्ट्राचाऱ्यांच्या अटकेपासून ते भारतावर १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर सीमा शुल्क लादण्यापर्यंतच्या अनेक निर्णयांनी खळबळ उडाली आहे. नेपाळच्या सरकारने आता प्रशाकीय सुधारणांच्या दिशेने पाऊल उचलले आहे. नेपाळमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आता दोन वेळा पगार दिला जाणार आहे. या सोबतच आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Nepal News : नेपाळमध्ये नव्या पंतप्रधानांविरोधात संतापाची लाट; बालेन शाह यांना ‘तो’ निर्णय पडणार महागात

पंधरवड्याला पगार

नेपाळ(Nepal) च्या अर्थ मंत्रालयाने १७ एप्रिल रोजी नवीन वेतन धोरणावर शिक्कामोर्बत केले. या धोरणांतर्गत कर्मचाऱ्यांच्या हातात नियमित अंतराने पैस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना खर्चाचे नियोजनही सोपे जावे असा या मागचा हेतू आहे. आतापर्यंत महिन्याला पगार देण्याची पद्धत होती. परंतु बालेन शाह  सरकारने यात बदल करुन पंधरा दिवसांनी पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण संस्थांमधून राजकारण हद्दपार

याशिवाय पंतप्रधान बालेन शाह यांनी शैक्षणिक क्षेत्रातही कठोर पावले उचलली आहेत. सरकारी विद्यापीठे आणि आरोग्य संस्थांमधील राजकीय पक्षाशी संबंधित विद्यार्थी आणि कर्मचारी संघटनान बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा उद्देश शैक्षणिक संस्थांचा वापर राजकारणासाठी न होता केवळ संशोधन आणि शिक्षणासाठी व्हावा असा आहे. यामुळे ज्युन्या राजकीय संघटनांच्या जागी आथा स्टुडंट काऊन्सिल किंवा  व्हाइस ऑफ स्टुडंट या विना राजकीय संघटना तयार करण्यात आल्या आहेत.

भ्रष्ट्राचाराला उखडून टाकणारच्या प्रयत्न

नेपाळच्या नव्या बालेन सरकारने भ्रष्टाचाराविरोधातही पावले ऊचलली आहे. माजी पंतप्रधान आणि उच्चअधिकाऱ्यांसह सुमारे १०० लोकांच्या मालमत्तेची चौकशीही सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

भारतीय वस्तूंवर कस्टन ड्यूटी

याशिवाय बालेन शाह यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे नेपाळच्या सीमेवर राहणाऱ्या स्थानिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बालेन शाह यांनी भारताकडून येणाऱ्या १०० रुपयांहून अधिक किमतीच्या प्रत्येक वस्तूवर सीमा शुल्क लागू केले आहे. अवैध तस्करी रोखण्याचा याचा हेतू आहे. मात्र या निर्णयामुळे भारत आणि नेपाळच्या संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! शपथ घेताच बालेन शाह यांचा दणका; माजी पंतप्रधानांना थेट तुरुंगात धाडले, देशभरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आता कधी पगार मिळणार?

    Ans: नेपाळ सरकारच्या नव्या वेतन धोरणानुसार कर्मचाऱ्यांना आता महिन्याच्या शेवटी पगार न मिळता १५ दिवसांनी पगार दिला जाणार आहे.

  • Que: पगार देण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा नेपाळ सरकारचा हेतू काय आहे?

    Ans: बाजारपेठेत खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढतील, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

  • Que: शैक्षणिक संस्थेबाबत कोणता निर्णय बालेन शाह सरकारने घेतला आहे?

    Ans: पंतप्रधान बालेन शाह यांनी विद्यापीठे आणि सरकारी रुग्णालयांमधील विद्यार्थी संघटना आणि कर्मचारी संघटना बरखास्त केल्या आहेत. याऐवजी स्टुडंट काऊन्सिल किंवा  व्हाइस ऑफ स्टुडंट या विना राजकीय संघटना तयार करण्यात आल्या आहेत.

Web Title: Nepal govt employees to get paid twice monthly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Balen Shah
  • Nepal News
  • World news

संबंधित बातम्या

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?
1

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?

सेकंदांचा उशीर अन् थेट बाद! महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘टाईम आऊट’चा थरार, ‘ही’ खेळाडू ठरली बळी
2

सेकंदांचा उशीर अन् थेट बाद! महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘टाईम आऊट’चा थरार, ‘ही’ खेळाडू ठरली बळी

Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा; युरोपीय देशांना भोगावे लागणार परिणाम?
3

Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा; युरोपीय देशांना भोगावे लागणार परिणाम?

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?
4

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.