Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! शपथ घेताच बालेन शाह यांचा दणका; माजी पंतप्रधानांना थेट तुरुंगात धाडले, देशभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, जनरेशन झेड च्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांनी ठोस कारवाई केली आहे. त्यांनी नेपाळच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगात धाडले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळच्या तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी माजी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली होती. या आंदोलनात विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. अनेकजण गंभीर जखमी झाले होते. या हिंसाचारासाठी ओली यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
नेपाळ(Nepal) चे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी रामनवमीच्या मूहुर्तावर शपथ घेतली. यानंतर त्यांनी तातडीने पहिली कॅबिनेट बैठक बोलावली. या बैठकीत तपास आयोगाच अहवाल स्वीकारण्यात आला. या अहवालात नेपाळ तरुणांवर झालेल्या हिंचाराचे गंभीर आरोप ओली आणि रमेश लेखक यांच्यावर ठोठवण्यात आले होते. हा अहवाला मंजूर झाल्यानंतर आज पहाटेच माजी गृहमंत्री रमेश लेखक आणि त्यानंतर केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या तपास आयोगाच्या अहवावलात केवळ राजकीय नेतेच नाही, तर लष्कराच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सध्या या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करता येणार नाही, परंतु नव्या सरकारने त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
बालेन शाह नेपाळच्या तरुणांचा सर्वात लोकप्रिय नेते मानले जाते. त्यांच्या या कारवाईमुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढणार आहे. आंदोलनांदरम्यान तरुणांनी दोषींना शिक्षेची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर बालेन यांनी केलेल्या कारवाईमुळे ते पुन्हा एकदा केवळ शब्दांचे नव्हे, तर कृती करणारे नेते बनले आहेत. बालेन यांच्या या धडाकेबाज निर्णयामुळे तरुणांनी जल्लोष साजरा केला आहे. नेपाळमधील ही कारवाई सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
Ans: नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाहन यांनी जनरेशन-झेड च्या आंदोलानात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री राकेश लेखक यांना तुरुंगात पाठवले आहे.
Ans: सप्टेंबरमध्ये झालेल्या जनरेशनल झेडच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूसाठी केपी ओली यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
Ans:






