nepal protest latest updates Why nepal's former pm choose shivpuri to marathi
Nepal former PM Oli sharma : काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून अराजक स्थिती आहे. देशातील Gen Z तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे भयावह वातावरण आहे. सध्या देशात नवे अंतरिम सरकार स्थापनेची तयारी सुरु आहे. यामुळे देशाच्यासर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियांवरील व्हायरल व्हिडिओ आणि वृत्तांमधून नेपाळच्या रस्त्यांवर जाळपोळ आणि हिंसाचाराचे दृश्य पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा राजीनामा दिल्यानंतर शिवपुरीमध्ये नेपाळी सैन्याच्या सुरक्षेत आहेत. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली.
या पोस्टनुसार ओली शर्मा शिवपुरीमध्ये सुरक्षित असून सैन्यच्या देखरेखेखाली आहेत. याचे वेळी लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, शिवपुरी ठिकाणी कुठे आहे? ओली शर्मा यांनी हेच ठिकाण का निवडले?
ना चीन… ना दुबई; ‘या’ देशाच्या बिळामध्ये लपले आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा
नेपाळमध्ये सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीमुळे तीव्र आंदोलन सुरु होते. यासाठी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि नेपोटिझम अशा कारणे असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान या हिंसक निदर्शनात ओली शर्मा यांच्या पंतप्रधान पदाची मागणी केली जात होती. तसेच सरकारमधील इतर मंत्र्यांचा राजनीमा देखील मागण्यात आला होता. दरम्यान संसद भवन, राष्ट्रपती भवन, नेत्यांची घरे पेटवण्यात आली. अनेक नेत्यांना मारहाणही करण्यात आली. यामुळे बिघडती परिस्थिती पाहून ओलींनी राजीनामा दिला.
आतापर्यंत कोणते अधिकारी शिवपुरीमध्ये गेले
मिळालेल्या माहितीनुसार, २००५ मध्ये नेपाळचे विरोधी पक्षनेते गिरिजा प्रसाद कोइराला शिवपुरीमध्ये गेल्या होता. यावेळी माजी राजा ज्ञानेंद्र यांच्या सत्तापालटाची स्थिती होती.
नेपाळच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी २००६ मध्ये केपी ओली शर्मा, नेपाळी कॉंग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी लपले होते. त्यावेळी नेपाळमध्ये तीव्र जनआंदोलन सुरु होते.
अनेकवेळा भूकंपाच्या परिस्थितीमध्ये देखील अनेक सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना याठिकाणी सुरक्षित नेण्यात आले आहे. २०११ मध्ये नेपाळवर राजकीय संकट उभे राहिले होते, यावेळी देखील कॅबिनेट मंत्री येथे राहिले आहेत.
FAQs (संबंधित प्रश्न)
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली देश सोडून कुठे गेले?
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली देश सोडून चीन किंवा दुबईत गेले असल्याचे म्हटले जात होते, पण स्वत: ओली यांनी काठमांडूच्या उत्तरकडील एक शिवपुरीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ओलींनी शिवपुरी हेच ठिकाण निवडले?
शिवपुरी हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण अत्यंत सुरक्षितही मानले जाते, यामुळे ओली यांनी हे ठिकाण निवडले असून इतर राजकीय नेतेही या ठिकाणे गेले आहेत.
India-Nepal FYI: नेपाळमध्ये जाण्यासाठी का लागत नाही पासपोर्ट किंवा व्हिसा? 1950 चा करार काय सांगतो?