nepal's gen z to form a political party
Nepal News in Mratahi : काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) पुन्हा एकदा राजकीय गोंधळ उडाला आहे. नेपाळच्या जनरेशन झेडच्या तरुणांनी एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे नेपाळच्या राजकीय पक्षांमध्ये गोंधळ उडाला आहे. शनिवारी (१८ ऑक्टोबर) नेपाळच्या जनरेशन झेडच्या तरुणांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. येत्या २०२६ मध्ये ५ मार्चला नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नेपाळच्या जनरेशन झेडच्या तरुणांनी हा निर्णय घेतला आहे.
नेपाळच्या जनरेशन झेडच्या निवडणूकीत भाग घेणार असून यासाठी काही मूलभूत अटीं ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्यावर जनरेशन-झेड नेपाळच्या निवडणूकीत सहभाग होणार आहे.
नेपाळ जनरेशन झेड आंदोलन
नेपाळमध्ये दोन महिन्यांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी माजी सराकरीविरोधात तीव्र आंदोलन झाले होते. सरकारने सोशल मीडियावरील घातलेल्या बंदीविरोधात हे आंदोलन होते. तसेच नेपोटिझम, भ्रष्टाचार आणि देशातील वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरुन हे आंदोलन तीव्र झाले होते. जनरेशन-झेडच्या तरुणांनी हे आंदोलन छेडले होते. या तरुणांनी ओली सरकारीच पूर्ण सत्ता उलटून टाकली होती. आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणाच हिंसाचरही झाला होता.
अंतरिम सराकरीच स्थापना
दरम्यान आता अंतरिम सराकरची स्थापना झाली असून याचे नेतृत्त्व माजी महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की (Sushila Karki) करत आहेत. त्यांनी ०५ मार्च २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूका घेण्याचे जाहीर केले आहे. अंतरिम मंत्रीमंडळाची स्थापना झाली असून सर्व राजकीय पक्षांना १६ ते २६ नोव्हेंबर आणि नवीन राजकीय पक्षांना १५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याची मुदत दिली आहे. याच वेळी नेपाळच्या जनरेशन-झेड च्या तरुणांनी स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे.
मिराज ढुंगाना यांनी या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, जनरेशन झेडच्या तरुणांना एकत्र करण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. पण त्यांच्या मूलभूत मागण्या पूर्ण होईपर्यंत निवडणूकीत ते भाग घेणार नाहीत, असेही मिराज ढुंगाना यांनी स्पष्ट केले आहे.
जनरेशन झेड च्या गटाने थेट निवडून आलेली कार्यकारी व्यवस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. नेपाळला नव्या व्यवस्थेची आवश्यकता असून पंतप्रधान आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची निवड लोकांद्वार केली जावी.
तर दुसरी मागणी परदेशात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना देखील मतदाना अधिकार असावा, असे जनरेशन-झेडच्या तरुणांनी म्हटले आहे. याचा उद्देश नेपाळच्या राजकीय रचनेत बदल घडवणे आहे.
प्रश्न १. नेपाळच्या जनरेशन-झेड च्या तरुणांनी काय घोषणा केली?
नेपाळच्या जनरेशन-झेड च्या तरुणांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे, तसेच त्यांच्या मूलभूत अटी मान्य झाल्याशिवाय निवडणूकीत सहभागी होणार नसल्याचेही म्हटले आहे.
प्रश्न २. नेपाळच्या तरुणांनी काय मागणी केली आहे?
नेपाळच्या तरुणांनी लोकांद्वारे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची निवड व्हावी, तसेच परदेशात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना मतदाना अधिकार मिळावा अशी मागणी केली आहे.