Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : तेहरानमध्ये इंधन कोटा घटवला; तेल प्रकल्पांवरील हल्ल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

पश्चिम आशियातील संघर्ष आता अत्यंत गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणची राजधानी तेहरानमधील तेल ठिकान्यांवर झालेल्या भीषण हल्ल्यांमुळे संपूर्ण क्षेत्र हादरले असून, यामुळे इंधन पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 08, 2026 | 03:36 PM
( फोटो सौजन्य : AI )

( फोटो सौजन्य : AI )

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या तेहरानमधील तेल ठिकाणांवर भीषण हल्ल्यांमुळे संपूर्ण क्षेत्र हादरलं
  • इराणच्या राजधानीवर प्रमुख तेल ठिकाणांवर हल्ले
  • ‘विषारी पाऊस’ पडण्याची शक्यता
US Iran War : पश्चिम आशियातील संघर्ष आता अत्यंत गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणची राजधानी तेहरानमधील तेल ठिकान्यांवर झालेल्या भीषण हल्ल्यांमुळे संपूर्ण क्षेत्र हादरले असून, यामुळे इंधन पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तरित्या केलेल्या या हल्ल्यांनंतर तेहरान प्रशासनाने तातडीने पावले उचलत इंधनाच्या कोट्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

International Women’s Day:बिकट परिस्थितीत तालिबानी दहशतीला न जुमानता ‘रेडिओ बेगम’ बनला अफगाण महिलांचा बुलंद आवाज

गव्हर्नरचं नागरिकांना आवाहन

इराणच्या गव्हर्नरने नागरिकांना आवाहन केले आहे की, वैयक्तिक इंधन कार्डद्वारे मिळणारा दैनंदिन कोटा ३० लिटरवरून २० लिटरवर आणण्यात आला आहे. ही व्यवस्था केवळ दोन-तीन दिवसांसाठी तात्पुरती असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंधन पुरवठा सुरळीत होताच परिस्थिती सामान्य केली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

इराणच्या राजधानीवर प्रमुख तेल ठिकाणांवर हल्ले

या संघर्षाचे स्वरूप अत्यंत भीषण आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या लष्करी संघर्षात इराणच्या राजधानीवर रात्रीच्या वेळी पाच प्रमुख तेल ठिकान्यांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये तेहरानचे आकाश दाट धुराच्या लोटानी व्यापलेले दिसत आहे. येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प तासन् तास धगधगत होते. इस्रायली मीडियाच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात इराणचे ३० इंधन टँक आणि ३ तेल डेपो नष्ट करण्यात आले आहेत.

 ‘विषारी पाऊस’ पडण्याची शक्यता

या सर्व प्रकारामुळे इराणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीने (IRCS) एका महत्त्वाच्या इशाऱ्याद्वारे नागरिकांना सावध केले आहे. तेल प्रकल्पांमधील स्फोटांमुळे वातावरणात घातक रसायने मिसळली गेली असून, लवकरच ‘विषारी पाऊस’ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस त्वचेसाठी अत्यंत दाहक ठरू शकतो आणि यामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

‘हे’ पाच देश इराणच्या इशाऱ्यावर

मात्र, इराणनेही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायलसोबतच कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन आणि संयुक्त अरब अमिराती या पाच देशांना आपल्या निशाण्यावर घेतले आहे. इराणने स्पष्ट शब्दांत ठणकावले आहे की, ते अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध पुढील सहा महिने युद्धासाठी पूर्णपणे सक्षम आहेत. एकूणच, या तेल शुद्धीकरण केंद्रांवरील हल्ल्यांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून, संपूर्ण पश्चिम आशियातील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. जागतिक स्तरावर या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

US Iran War : अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका, हल्ले सुरुच; 52000 भारतीय मायदेशी परतले

Web Title: Iran war tehran fuel quota reduced after strikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran Attack
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Tension : ‘व्यापारी जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवा’ ; होर्मुझबाबत भारताची कठोर भूमिका
1

Hormuz Tension : ‘व्यापारी जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवा’ ; होर्मुझबाबत भारताची कठोर भूमिका

US Iran War : चीन-रशियाला मोठा धक्का? अमेरिकेने उडवला इराणमधील सर्वात महत्त्वाचा पूल
2

US Iran War : चीन-रशियाला मोठा धक्का? अमेरिकेने उडवला इराणमधील सर्वात महत्त्वाचा पूल

Hormuz Tension : होर्मुझमध्ये भारतीयाचा मृत्यू ! सरकारने थेट इराणला ‘हा’ इशाराच दिला; राजदूतालाही समन्स
3

Hormuz Tension : होर्मुझमध्ये भारतीयाचा मृत्यू ! सरकारने थेट इराणला ‘हा’ इशाराच दिला; राजदूतालाही समन्स

US Iran War : ट्रम्प यांचा इराणला आणखी कडक इशारा; आता ‘हे’ महत्त्वपूर्ण ठिकाण हिट लिस्टवर, कधीही होऊ शकतो हल्ला
4

US Iran War : ट्रम्प यांचा इराणला आणखी कडक इशारा; आता ‘हे’ महत्त्वपूर्ण ठिकाण हिट लिस्टवर, कधीही होऊ शकतो हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.