अमेरिकेत ट्रम्प विरोधात पेटले रान! वॉशिंग्टन ते लॉस एंजेलिसपर्यंत 'No Kings Protest'मध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
No Kings Protest in America : वॉशिंग्टन : अमेरिकेत शनिवारी (१८ ऑक्टोबर) अनेक राज्यांमध्ये देशव्यापी आंदोलन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विरोधात लाखो लोक लॉस एंजेलिस, न्यूयॉर्कसह अनेक शहरांमध्ये नो किंग्स प्रोटेस्ट झाली. लोकांनी शांततापूर्ण आंदोलन केले.
अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वात मोठे लोकशाही आंदोलन असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या जवळपास ५० राज्यांमध्ये २,५०० ठिकाणी लोकांनी शांततापूर्ण निदर्शने केली. वॉशिंग्टन डीसी., न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, अटलांटा आणि शिकागो यांसारख्या शहरांमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले होते.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा फोडला टॅरिफ बॉम्ब! २५% कर लागू केल्याने ‘या’ क्षेत्रांना बसणार फटका
हे आंदोलन मुख्यता ट्रम्प प्रशासनाच्या हुकूमशाहीविरोधात आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ काढण्यात आले होते. लोकांनी ट्रम्प प्रशासनावर लोकशाही संस्थांना कमकुवत केल्याचा आरोप केला. तसेच ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाविरोधात, ICE छापांविरोधात, फेडरल सैनिकांच्या देशांतर्गत तैनातीविरोधात हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनादरम्यान लोकांमध्ये ट्रम्प प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी दिसून आली.
लॉस एंजेलिसमध्ये तर मोठ्या प्रमाणावर लोकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होते. हजारो लोक अमेरिकन आणि मेक्सिकन झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते. अटलांटमध्ये निदर्शनकर्त्यांनी सिव्हिक सेंटपासून मार्च काढले. या निदर्शनांदरम्यान नो किंग्स असे नारे देण्यात आले. ही निदर्शने अशा वेळी होत आहेत, जेव्हा अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरु असून सरकारी कामकाज ठप्प पडले आहे. यामुळे देशांतर्गत तणावाचे वातावरण वाढत आहे.
दरम्यान या आंदोलनांना ट्रम्पच्या विरोधकांकडून पूर्णत: पाठिंबा मिळत आहे. विशेष करुन कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी सोशल मीडियावरुन नागरिकांना शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहनही केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपली ताकद एकतेत आणि शांततेत आहे.
तसेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या चक शूमर यांनी देखील निदर्शनात सहभाग घेतला होता. त्यांनी म्हटले की, अमेरिकेत कोणीही राजा नाही, इथे फक्त लोकशाहीला मान्यता असेल. तसेच बर्नी सॅंडर्स यांनी देखील अमेरिका ही लोकांची सत्ता आहे, राजेशाही नाही, असे म्हणत निदर्शकांना समर्थन दर्शवले.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती दिवभराच्या आंदोलनानंतर सामान्य झाली आहे. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या लोकांमध्ये लोकशाहीच्या नव्या मूल्यांबद्दल चर्चा सुरु झाली आहे. आता नो किंग्स प्रोटेस्ट हे ट्रम्पविरोधी आंदोलन राहिलेले नाही, तर हुकूमशषाही विरोधात आंदोलन झाले आहे.
प्रश्न १. काय आहे अमेरिकेतील नो किंग्स प्रोटेस्ट?
नो किंग्स प्रोटेस्ट हे एक देशव्यापी आंदोलन असून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या हुकूमशाही निर्णयांविरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
प्रश्न २. अमेरिकेत किती राज्यांमध्ये सुरु आहे नो किंग्स प्रोटेस्ट?
अमेरिकेच्या जवळपास ५० राज्यांमध्ये २,५०० ठिकाणी ट्रम्प प्रशासानाविरोधात नो किंग्स प्रोटेस्ट सुरु आहे.
प्रश्न ३. काय आहे नो किंग्स प्रोटेस्टचा मुख्य उद्देश?
या आंदोलनाचा मुख्य उद्देश ट्रम्प प्रशासनाच्या हुकूमशाहीविरोधात आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ उभे राहणे आहे.