NIA team arrives in Delhi with Tahawwur Rana Pakistan's first reaction on Tahawwur Rana
इस्लामाबाद: अखेर मुंबई 26/11 च्या दहशतवादी हलल्यातील प्रमुख आरोप तहव्वुर हुसेन राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले आहे. भारतात येताच NIA चे पथकाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले आहे. त्याला एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले आहे. लवकरच त्याला NIA च्या न्यायालयात दाखल केले जाईल. अखेर 19 वर्षानंतर मुबंई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टमांइड भारतात परतला आहे.
दरम्यान पाकिस्तानकडून पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने राणाच्या प्रकरणापासून आपली भूमिका वेगळी ठेवली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले असून म्हटले आहे की, गेल्या दोन दशकांपासून राणाने आपल्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही.
सध्या तो पाकिस्तानाच नव्हे कॅनडाचा नागरिक आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान राणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. राणाचे पाकिस्तान सैन्याशी आणि गुप्तचर संस्थेशी जुने सबंध आहेत. यामुळे पाकिस्तानला भीती आहे की, भारतात चौकशीदरम्यान, राणा पाकिस्तानचा पर्दाफाश करु शकतो.
🔴LIVE: Spokesperson’s Weekly Press Briefing 10-04-2024 at Ministry of Foreign Affairs, Islamabad https://t.co/OkT0aBd6U9
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) April 10, 2025
राणा एक दशकाहून अधिक काळ अमेरिकेच्या तुरुंगात होता. अनेक वर्षांपासून त्याच्या भारतात प्रत्यार्पाणाचे प्रयत्न सुरु होते. NIA त्याला अटक करेल या भीतीने त्याने अमेरिकेच्या न्यायालयात धाव घेतली होती.सध्या त्याला NIA ने अटक केली असून मुख्यालयात दाखल केले जाईल. नंतर वैद्यकीय तपासणी करण्याच येईल आणि थेट पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर केले जाऊ शकते.
राणाला 2009 मध्ये FBIकडून अटक करण्यात आली होती. राणावर लष्कर-ए-तोएबला पाठिंबा दिल्याचा आरोप करत अमेरिकने दोषी करार दिला होता. तव्हहुर राणा हा माजी डॉक्टर आणि उद्योगपथी असून पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. राणावर 26/11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार डेव्हिड हेडली याला गुप्तचर कार्यात मदत केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांचे पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI शी देखील संबंधत आहेत.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या प्रत्यार्पणला मानत्या दिली. ट्रम्प यांनी राणाला ‘धोकादायक दहशतवादी’ म्हणून संबोधले आहे. ट्रम्प यांच्या मंजुरीनंतर अखेल 19 वर्षानंतर राणाला भारतात आणण्यात आले आहे.