तहव्वुर हुसेन राणा भारतात येताच मिळाली 'इतक्या' दिवसांची कोठडी; आता चौकशीचा मार्ग मोकळा होणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: अखेर मुंबई 26/11 च्या दहशतवादी हलल्यातील प्रमुख आरोप तहव्वुर हुसेन राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले आहे. भारतात येताच NIA चे पथकाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले आहे. त्याला एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले आहे. लवकरच त्याला NIA च्या न्यायालयात दाखल केले जाईल. अखेर 19 वर्षानंतर मुबंई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टमांइड भारतात परतला आहे.
राणा एक दशकाहून अधिक काळ अमेरिकेच्या तुरुंगात होता. अनेक वर्षांपासून त्याच्या भारतात प्रत्यार्पाणाचे प्रयत्न सुरु होते. NIA त्याला अटक करेल या भीतीने त्याने अमेरिकेच्या न्यायालयात धाव घेतली होती.सध्या त्याला NIA ने अटक केली असून मुख्यालयात दाखल केले जाईल. नंतर वैद्यकीय तपासणी करण्याच येईल आणि थेट पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर केले जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला 2009 मध्ये FBI कडून अटक करण्यात आली होती. तसेच अमेरिकेने लष्कर-ए-तोएबला पाठिंबा दिल्याने राणाला दोषी करार दिला होता.26/11 चा मुंबई हल्ला- राणाने हेडलीला मुंबईत बेकायदेशीरपणे भारतात येण्यासाठी मदत केली होती. त्याने आपल्या व्यवसायाचा व्यापर हेडलीली भारतात आणण्यासाठी केला. 2009 मध्ये शिकागो येथे FBI ने पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्कमध्ये राणाच्या भूमिकेसाठी अटक केली होती. मात्र, मुंबई हल्ल्याशी त्याचा थेट संबंध असल्याचा पुरावा न मिळाल्याने त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
दरम्यान पाकिस्तानकडून पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने राणाच्या प्रकरणापासून आपली भूमिका वेगळी ठेवली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले असून म्हटले आहे की, गेल्या दोन दशकांपासून राणाने आपल्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही.
सध्या तो पाकिस्तानाच नव्हे कॅनडाचा नागरिक आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान राणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. राणाचे पाकिस्तान सैन्याशी आणि गुप्तचर संस्थेशी जुने सबंध आहेत. यामुळे पाकिस्तानला भीती आहे की, भारतात चौकशीदरम्यान, राणा पाकिस्तानचा पर्दाफाश करु शकतो.