China On US: व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईमुळे चीन संतप्त, मादुरोच्या अटकेला चुकीचे म्हटले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
China reaction to US capture of Nicolas Maduro 2026 : अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) आणि त्यांच्या पत्नीला ज्या प्रकारे अटक केली, त्यावरून आता जागतिक राजकारण तापले आहे. अमेरिकेचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चीनने या कारवाईवर आगपाखड केली आहे. “एका सार्वभौम देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अशा प्रकारे अटक करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचा खून आहे,” अशा कडक शब्दांत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचा निषेध केला आहे. या घटनेमुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव आता एका नव्या टोकाला पोहोचला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, “अमेरिका आंतरराष्ट्रीय नियमांना पायदळी तुडवत आहे. लष्करी बळाचा वापर करून दुसऱ्या देशाचे सरकार उलथवून टाकणे ही निव्वळ वर्चस्ववादी मानसिकता आहे.” चीनने ही कारवाई संयुक्त राष्ट्रांच्या (UN Charter) तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे म्हटले आहे. बीजिंगच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे केवळ दक्षिण अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगात अस्थिरता निर्माण होऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested : ‘कायर लोकांनो या…’ मादुरोचं चॅलेंज ट्रम्पने स्वीकारलं, सहपत्नीक घातल्या बेड्या; व्हेनेझुएलात आता अमेरिकन राजवट
या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे, अमेरिकन सैन्याने कराकसवर बॉम्बफेक सुरू करण्याच्या अवघ्या ६ ते ७ तास आधी चीनचे विशेष दूत क्यू शियाओकी (Qiu Xiaoqi) यांनी मादुरो यांची भेट घेतली होती. या भेटीत चीनने मादुरो सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. चिनी शिष्टमंडळ कराकसमध्ये असतानाच अमेरिकेने हा सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे चीनला हा स्वतःचा अपमान वाटत आहे. ट्रम्प यांच्या या धाडसी कारवाईने चीनचा लॅटिन अमेरिकेतील प्रभाव एका झटक्यात मोडीत काढला आहे.
JUST IN: 🇺🇸🇻🇪🇨🇳 China on US kidnapping of Maduro: “The hegemonic behavior of the United States is a serious violation of international law, an infringement on Venezuela’s sovereignty, and a threat to peace and security. We strongly oppose the US action and urge Washington to… pic.twitter.com/FIFyj2QLeo — Megatron (@Megatron_ron) January 3, 2026
credit : social media and Twitter
चीनने व्हेनेझुएलामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. व्हेनेझुएला हा चीनचा प्रमुख तेल पुरवठादार देश आहे. आता मादुरो यांच्या अटकेनंतर आणि अमेरिकेने तिथल्या तेल क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याच्या घोषणेनंतर, चीनला आपल्या गुंतवणुकीची भीती वाटू लागली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, व्हेनेझुएलाच्या तेलातूनच या मोहिमेचा खर्च वसूल केला जाईल. चीनने याला ‘उघड लूट’ असे संबोधले असून अमेरिकेला तातडीने ही कारवाई थांबवण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली
चीनने इशारा दिला आहे की, अमेरिकेची ही ‘साम्राज्यवादी’ वृत्ती लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशाला युद्धाच्या खाईत लोटू शकते. ब्राझीलसारख्या देशांनीही या कारवाईवर चिंता व्यक्त केली असून, चीन आता या प्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) अमेरिकेला घेरण्याच्या तयारीत आहे. अमेरिका आता व्हेनेझुएलामध्ये स्वतःचे ‘बाहुले सरकार’ (Puppet Government) बसवेल, अशी भीती चीनने व्यक्त केली आहे.
Ans: चीनने या कारवाईला 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्र सनदेचे उल्लंघन' म्हटले असून, याला अमेरिकेची वर्चस्ववादी मानसिकता ठरवले आहे.
Ans: हल्ल्याच्या अवघ्या ६-७ तास आधी मादुरो यांनी चिनी विशेष दूत क्यू शियाओकी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली होती.
Ans: चीनने व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून, मादुरो हे लॅटिन अमेरिकेतील चीनचे सर्वात जवळचे राजकीय मित्र होते.






