US -Venezuela Tension: १५० विमाने आणि ३० मिनिटे! व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेण्यात अमेरिकेला 'असे' आले यश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Operation Absolute Resolve details 2026 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगाने एका अशा लष्करी कारवाईचा अनुभव घेतला, ज्याची तुलना केवळ ओसामा बिन लादेनविरुद्धच्या मोहिमेसोबत केली जाऊ शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन अॅब्सोल्यूट रिझॉल्व’ (Operation Absolute Resolve) अंतर्गत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. ही मोहीम केवळ ३० मिनिटांत फत्ते झाली आणि मादुरो यांची वर्षानुवर्षांची सत्ता अवघ्या काही तासांत कोसळली.
अमेरिकन इंटेलिजन्स मागील अनेक महिन्यांपासून मादुरोच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. मादुरो कोणत्या वेळी काय करतात, त्यांचे पाळीव प्राणी कोणते, अगदी ते कोणत्या प्रकारचे कपडे घालतात, याची इत्थंभूत माहिती गोळा करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेने मादुरोच्या निवास्थानाची (Miraflores Palace) हुबेहूब प्रतिकृती तयार केली होती. विशेष दलाच्या जवानांनी या ‘डमी’ मॉडेलवर शेकडो वेळा सराव केला, जेणेकरून प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी एका सेकंदाचाही विलंब होऊ नये.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
शुक्रवारी रात्री १०:४६ वाजता ट्रम्प यांनी या मोहिमेला अंतिम मंजुरी दिली. रडारला चकवा देण्यासाठी अमेरिकन हेलिकॉप्टर्स समुद्रसपाटीपासून अवघ्या १०० फूट उंचीवरून उड्डाण करत व्हेनेझुएलात शिरले. त्याच वेळी आकाशात १५० हून अधिक अमेरिकन लढाऊ विमाने, बॉम्बर्स आणि ड्रोन्सनी एक सुरक्षा कवच तयार केले. हल्ल्याच्या काही मिनिटे आधी कराकस शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, ज्यामुळे व्हेनेझुएलाच्या सैन्याला काय घडत आहे, याचा अंदाजच आला नाही.
JUST IN: US FINALLY DID IT taking out Venezuelan dictator Nicolas Maduro has just landed in New York aboard a DOJ 757 Freedom For Venezuela 🇻🇪 Source: AZ Intel pic.twitter.com/OihYvajfr8 — Ape𝕏 (@CubanOnlyTrump) January 3, 2026
credit : social media and Twitter
जेव्हा ‘डेल्टा फोर्स’चे कमांडोज मादुरोच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस (Cilia Flores) गाढ झोपेत होते. आवाजाची चाहूल लागताच मादुरो यांनी एका अतिशय मजबूत ‘स्टील सेफ रूम’मध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्या सुरक्षित खोलीचा दरवाजा बंद करू शकले नाहीत. कमांडोजनी अत्यंत चपळाईने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. या मोहिमेत एकही अमेरिकन सैनिक मारला गेला नाही, हे या ऑपरेशनचे सर्वात मोठे यश मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप
अटकेनंतर मादुरो यांना तातडीने हेलिकॉप्टरने समुद्रात तैनात असलेल्या ‘USS Iwo Jima’ या युद्धनौकेवर नेण्यात आले. तिथे मादुरो यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेले आणि कानात आवाज रोखणारे हेडफोन्स लावलेले फोटो ट्रम्प यांनी स्वतः शेअर केले. सध्या मादुरो न्यूयॉर्कमधील एका सुरक्षित तुरुंगात असून, त्यांच्यावर ‘नार्को-टेररिझम’ आणि ड्रग्स तस्करीचे खटले चालवले जाणार आहेत.
Ans: हे अमेरिकन लष्कराचे एक गुप्त ऑपरेशन होते, ज्याद्वारे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेला नेण्यात आले.
Ans: या मोहिमेत १५० हून अधिक अमेरिकन विमानांनी आणि हेलिकॉप्टर्सनी सहभाग घेतला होता.
Ans: मादुरो यांना न्यूयॉर्कमध्ये नेण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी खटला चालवला जाईल.






