Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निमिषाला तात्काळ फाशीवर लटकवा’ ; तलालच्या कुटुंबाकडून भारतीय धर्मगुरूंच्या मध्यस्थीला नकार, मृत्युदंडाच्या मागणीवर ठाम

Nimisha Priya Case : निमिषा प्रियाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न आता असफल होत चालले आहे. पीडिताच्या कुटुंबाने पुन्हा एकदा निमिषाच्या फाशीची मागणी मांडली आहे. यामुळे निमिषाला वाचवण्याचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 11, 2025 | 05:34 PM
Nimisha Priya Case Victim's brother again demands immediate excecution of Nimisha Priya

Nimisha Priya Case Victim's brother again demands immediate excecution of Nimisha Priya

Follow Us
Follow Us:
  • निमिषा प्रियाच्या मृत्यूदंडाच्या मागणीने धरला जोर
  • धर्मगुरुंच्या मध्यस्थीस पीडिताच्या कुटंबाकडून नकार
  • गेल्या आठ वर्षांपासून निमिषा सुटकेची वाट पाहत आहे.
Nimisha Priya Case Update : साना : येमेनमध्ये (Yemen) मृत्यूदंडाची शिक्षा भोगत असलेल्या निमिषा प्रियाच्या (Nimisha Priya) अडचणी वाढत चालल्या आहेत. तिला वाचवण्यासाठीचे तिच्या कुटुंबीयांच्या आणि भारताच्या प्रयत्नांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. तलाल महदीचे कुटुंब मृत्यूदंडाच्या मागणीवर अडून राहिले आहे. कुटुंबाने तात्काळ फाशीची मागणी केली आहे. तसेच कुटुंबाने भारतीय धर्मगुरुंची मध्यस्थीही नाकारली आहे.

का शिक्षा भोगत आहे निमिषा?

येमेनमध्ये निमिषा प्रिया हिने येमेनी व्यापारी तलाल अब्दो महदी याची हत्या केली होती. या प्रकरणी निमिषा गेल्या आठ वर्षांपासून येमेनच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २०१८ मध्ये तिला महदीच्या खूनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. नंतर २०२० मध्ये येमेनच्या न्यायालयाने तिला मृत्यूंदडाची शिक्षा सुनावली. तिच्या बचावासाठी भारतीय धर्मगुरु ए. पी अबुबकर मुसलियार यांनी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांच्या मध्यस्थीला पीडिताच्या कुटुंबाने नकार दिला आहे.

Israel Attack On Gaza : इस्रायलच्या गाझातील कारवाया सुरुच; हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार

निमिषा प्रियाच्या तात्काळ फाशीची मागणी

यापूर्वी काही काळासाठी निमिषाची फाशी स्थगित करण्यात आली होती. परंतु तलाल महदीच्या भावाने अब्दुल फत्ताह महदीने तिच्या फाशीची मागणी केली. तलाल महदीच्या कुटंबाने निमिषा प्रियाला तात्काळ फाशी देण्याची मागणी पुन्हा एकदा मांडली आहे. महदीच्या भावाने अब्दुल फत्ताह यांनी म्हटले की, निमिषाला वाचवण्याचा धर्मगुरुंचा प्रयत्न केवळ कर्तव्याच्या भावनेने प्रेरित आहे.

या संदर्भात म्हटले की, “शासकीय कार्यालय, तसेच कंठापुरम आणि हबीब उमर बिन हाफिज यांच्या कुटुंबाला भेटण्याचा किंवा कोणताही संपर्क साधण्याची आमची इच्छा नाही. तसेच अब्दुलने म्हटले आहे की, निमिषाने माझ्या भावाचा खून केला आहे, याची तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. तसेच धर्मगुरुंनी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे आणि तथ्यांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करु नये.”

तलाल महदीचे कुटुंब मृत्यूदंडाच्या मागणीवर ठाम

अब्दुलने पुढे म्हटले की, “हा आमचा हक्क आहे आणि आमचे रक्त आहे. आम्ही कोणालाही घाबरत नाही.” त्याने निमिषावर कुटुंबाचा नऊ वर्षे छळ केल्याचा आरोप करत तिच्या मृत्यूदंडाची मागणी केली आहे. तसेच काही लोकांनी याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला असल्याचा आरोप महदीच्या भावाने केला आहे. त्याने म्हटले की, आमच्या रक्ताचा विजय होईपरयंत आम्ही झुकणार नाही.

तसेच अब्दुल फत्ताह महदीने त्याच्या भावाच्या मृत्यूबद्दल बोलताना म्हटले की, माझ्या भावची हत्या करण्यात आली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.त्याला आणि त्याच्या कुटुंबाला झालेल्या वेदनांसाठी न्याय मिळालाच पाहिजे असे त्याने म्हटले आहे. यामुळे आकाश कोसळले तरी मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्यात येणार नाही.

वॉशिंग्टनमध्ये बेघरांना नाही थारा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘व्हा बाहेर’चा नारा

Web Title: Nimisha priya case victims family again demands immediate excecution of nimisha priya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • Nimisha Priya
  • World news
  • yemen

संबंधित बातम्या

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा
1

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा

Oregon Shooting: वाढदिवसाची भेट ठरली काळ! आईने भेट दिलेल्या बंदुकीने मुलाने शाळेत केले हत्याकांड; 3 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा अंत
2

Oregon Shooting: वाढदिवसाची भेट ठरली काळ! आईने भेट दिलेल्या बंदुकीने मुलाने शाळेत केले हत्याकांड; 3 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा अंत

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद
3

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद

Breaking News :संघर्ष चिघळला ;हुथींनी केलेल्या हल्ल्यात येमेनच्या ५३ सैनिकांचा जागीच मृत्यू
4

Breaking News :संघर्ष चिघळला ;हुथींनी केलेल्या हल्ल्यात येमेनच्या ५३ सैनिकांचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.