वॉशिंग्टनमध्ये बेघरांना नाही थारा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 'व्हा बाहेर'चा नारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America News marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत असतात. अलीकडे त्यांनी आपल्या टॅरिफच्या निर्णयाने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. तसेच अनेक निर्णयांनी अमेरिकेतील लोकांना देखील धक्का दिला आहे. नुकतेच ट्रम्प यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाने अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीतील निराधार, बेघर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.
यामागचे कारण म्हणजे ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीतील बेघर लोकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बेघर लोकांना राजधानी रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी हा निर्णय गुन्हेगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी घेतले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, वॉशिंग्टन डीसीतील बेघर लोकांनी तातडीने बाहेर पडावे, त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा दिली जाईल मात्र राजधानीपासून लांब. तसेच त्यांचा आदेश न मानणाऱ्याला आणि गुन्हेरागांना थेट तुरुंगात टाकण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
Turkey Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली तुर्कीची जमीन; संपूर्ण परिसरात घबराट, भयावह VIDEO
ट्रम्प यांनी निराश्रित लोकांसाठी राहण्याची व्यवस्था शहरापासून लांब केली जाणार असल्याचे म्हटले. त्यांच्यासाठी तंबू उभारले जातील, तसेच शौचालयापासून ते डॉक्टरापर्यंत सर्व सोयी सुविधा दिल्या जातील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षामध्ये अमेरिकेत गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या कारणामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला वॉशिंग्टन डीसीचे महापौर मुरिएल बाउसर यांनी विरोध केला आहे. त्यांनी यावर टीका करत म्हटले आहे की, २०२३ मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते, मात्र आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. तसेच ट्रम्प यांचे दावे खोटे आणि असवास्तविक असल्याचे म्हटले आहे.
सध्या वॉशिंग्टन डीसीमध्ये ३,७८२ बेघर लोक आहेत. यातील ८०० लोक उघड्यावर राहतात. काही लोक आश्रयगृहांमध्ये राहतात. महापौर मुरिएल बाउसर यांच्या टीकेवर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुरिएल बाउसर यांना चांगली व्यक्ती म्हणून संबोधले आहे. परंतु ट्रम्प त्यांच्या विरोधाला न जुमानता देशातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी, तसेच शहर स्वच्छ करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
अलीकडे अंमेरिकेमध्ये वांशिक भेदभावरुन वाद वाझले आहे. याअंतर्गत बाल्टिमोरमध्ये सामूहिक गोळीबाराची घटना देखील घडली होती. यामध्ये ६ मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही न्यूयॉर्कसह अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत ९८ खूनांची नोंद झील आहे. यामध्ये कार चोरी, हल्ला आणि दरोडा अशा घटनांचाही समावेश आहे.
Israel Attack On Gaza : इस्रायलच्या गाझातील कारवाया सुरुच; हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार