Israel Attack On Gaza : तेल अवीव : रविवारी (१० ऑगस्ट) रात्री उशिरा इस्रायलने (Israel) पुन्हा एकदा गाझावर (Gaza) हल्ला केला आहे. गाझातील अल-शिफा रुग्णालयावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रुग्णालयाबाहेर असलेल्या तंबूवर हा हल्ला झाला. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल जझीराच्या ५ पत्रकारांचाही यामध्ये मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यात कतारच्या मीडिया हाऊस अल-जझीराचे अनस अल-शरीफ, अल-जझीराचे प्रतिनिधी मोहम्मद करिकेह आणि कॅमरामेन इब्राहिम झहीर, मोहम्मद नौफल आणि मोमेन अलिवा यांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानच्या Jaffar Express मध्ये बॉम्ब ब्लास्ट, ट्रेनचे 6 डबे रूळावरून घसरले
अल-जलझीराचे मीडिया हाउसचे प्रतिनिधी अनस अल-शरीफ यांनी मृत्यूपूर्वी एक पोस्ट केली आहे. या शेवटच्या पोस्टमध्ये इस्रायलवर त्यांचा आवाज दाबला गेल्याचा आरोप केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, लोकांपर्यंत माझे शब्द पोहोचले असतील असा विश्वास आहे, जाणून घ्या की मला मारण्यात आणि माझा आवाज दाबण्यात इस्रायल यशस्वी झाला आहे. त्यांनी सांगितले की, इस्रायलने गाझातील स्थानिक रुग्णालयावर हल्ला केला आहे.
🎯STRUCK: Hamas terrorist Anas Al-Sharif, who posed as an Al Jazeera journalist
Al-Sharif was the head of a Hamas terrorist cell and advanced rocket attacks on Israeli civilians and IDF troops.
Intelligence and documents from Gaza, including rosters, terrorist training lists and… pic.twitter.com/ypFaEYDHse— Israel Defense Forces (@IDF) August 10, 2025
इस्रायल डिफेन्स सिस्टमची प्रतिक्रिया (IDF)
मात्र इस्रायलने या आरोपांना नाकारले आहे. त्यांनी अनस अल-शरीफ हा हमासचा दहशतवादी होता, असा दावा केला आहे. इस्रायली सैन्याने दावा केला आहे. की, अनस अल-शरीफ हा हमाससाठी काम करत होते. अल-शरीफ हा हमासचा दहशतवादी असून तो स्वत:ला अल जझीराचा पत्रकार म्हणवून घेत होता.
त्याने इस्रायली नागरिकांवर आणि सैनिकांवर रॉकेट हल्ले केले आहेत. तसेच इस्रायलने अनस अल-शरीफ हा हमासचा प्रमुख असल्याचाही दावा केला आहे. IDF ने दावा केला आहे की, गाझामधून गुप्त माहिती, कागदपत्रे हमासपर्यंत पोहोचवण्याचे काम अल-शरीफ करत होता. इस्रायलने सांगितले की, त्याने रिपोर्टरच्या कामाला दहशतवादासाठी ढाल बनवले होते.
FAQs(संबंधित प्रश्न)
गाझात कधीपासून सुरु आहे युद्ध?
दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता, तेव्हापासून गाझामध्ये इस्रायल आणि हमास युद्ध (Israel Hamas War) सुरु झाले.
काय आहे गाझातील सद्यपरिस्थिती?
गाझामध्ये सध्या अत्यंत बिकट परिस्थिती आहे. इस्रायल आणि हामस युद्धामुळे गाझातील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या युद्धामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे.
Turkey Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली तुर्कीची जमीन; संपूर्ण परिसरात घबराट, भयावह VIDEO