North Korea arrests three officials over failed warship launch
प्योंगयोंग: बुधवारी २२ मे रोजी उत्तर कोरियात एक मोठी घटना घडली होती. उत्तर कोरियाची एक युद्धनौका पाण्यात कोसळली होती. या घटनेमुळे उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. याअंतर्गत चार अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सुमारे ५ हजार टन वजानाची युद्धनौका प्रक्षेपण कार्यक्रमादरम्यान पाण्यात कोसळही होती. या घटनेवळी उत्तर कोरियाचे हुकूमशाह स्वत:हा घटनास्थळी उपस्थि होते. त्यांनी या घटनेचे वर्णन देशाच्या प्रतिष्ठेवर हल्ला म्हणून केले. त्यांच्या विश्वासार्हतेला झटका बसला होता यामुळे किम जोंग उन यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. किम जोंग उन यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेसाठी जबाबदार असलेल्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य अभियंता कांग जोंग चोल, वर्कशॉप प्रमुख हान क्योंग हाक आणि किंम योंग हाक यांचा समावेश आहे. चौथ्या अधिकाऱ्याबद्दवल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
माध्यमांशी बोलताना नॉर्थ कोरिया लीडशिप वॉचचे संस्थापक मायकेल मॅडेन यांनी अधिकाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांना मृत्यूदंडाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे.माकडाला घाबरवण्यासाठी कोबंडीला मारा या धोरणाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांना सार्वजिक शिक्षा दिली जाण्याची शक्यता देखील मायकेल मॅडेन यांनी व्यक्त केली आहे.
मॅडेन यांनी म्हटले आहे की, काही लोकांना निलंबित करण्यात येणार आहे. काही लोकांच्या पगारात कपात केली जाणार आहे. तर काहींना पक्ष सदस्यत्व गमवावे लागणार आहे. काहींना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागले. परंतु अद्याप कोणती शिक्षा दिली जाईल याबाबत स्पष्टता नाही. यापूर्वीही उत्तर कोरियाने अशा प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा दिल्या आहेत. भर चौकात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. तसेच जन्मठेपेची शिक्षा आणि मृत्यूदंडाचीही शिक्षा देण्यात आली आहे.
उत्तर कोरियाचे अणु क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले जहाज रशियाच्या मंदतीन तयार करण्यात आले होते. अलीकडच्या काही काळत उत्तर कोरिया आपल्या लष्करी ताकदीत मोट्या प्रमामावर वाढ करत आहे. तसेच अणु आणि क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या देखील घेत आहे. अशातच उत्तर कोरियाची लष्करी ताकद वाढणे जगभरासाठी युद्धाचे संकेत आहेत.