उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्योंगयोंग: एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर कोरियाची नैदलाची एक युद्धनौका पाण्यात कोसळली आहे. यामुळे उत्तर कोरियाच्या नौदलाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (२१ मे) चोंगजिन बंदरावर ही घटना घडली. रशियन मदतीने उत्तर कोरियाच्या नैदलाची युद्धनौका पाण्यात जात होती. परंतु अचानक मोठा अपघात झाला, युद्धनौका पाण्यात कोसळली. या घटनेच्या वेळी किम जोंग उन स्वत:हा तिथे उपस्थित होते.
या घटनेनंतर किम जोंग यांनी शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या आपत्कालीन बैठकीत अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर कोरियाच्या राज्य एजन्सी केसीएनएने अपघाताचे कारण सांगितले. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रॅम्पवरुन खाली उतरताना युद्धनौकेचा तोल गेला आणि जहाज कोसळले.
दरम्यान ही घटना घडत असताना किम जोंग उन तेथेच उपस्थित होते. या घटनेनंतर किम जोंग यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी या घटनेचे वर्णन गंभीर अपघात आणि निष्काळजीपणा असे केले. त्यांनी शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी, शिपयार्ड कामगारांवर बेजबाबदरापणाचा आरोप केला. तसेच चुकी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत.
उत्तर कोरियाचे हे जहाज आधुनिक विध्वंसकाच्या श्रेणीचे होते. याचे २५ एप्रिल रोजी परिक्षण करण्यात आले होते. ही युद्धनौका अणु क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होती. युद्धनौकेवरील सर्व क्षेपणास्त्रांचीही यशस्वी चाचणी करण्यात आली होती. २०२६ मध्ये या युद्धनौकेला उत्तर कोरियाच्या नौदलात सामील करण्यात येणार होते.
उत्तर कोरियाचे अणु क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले जहाज रशियाच्या मंदतीन तयार करण्यात आले होते. अलीकडच्या काही काळत उत्तर कोरिया आपल्या लष्करी ताकदीत मोट्या प्रमामावर वाढ करत आहे. तसेच अणु आणि क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या देखील घेत आहे. अशातच उत्तर कोरियाची लष्करी ताकद वाढणे जगभरासाठी युद्धाचे संकेत आहेत. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी नौदलात अनेक पाणबुड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रशिया उत्तर कोरियाला मदत करत आहे. यामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांची चिंता वाढली आहे. उत्तर कोरियाच्या लष्करी सरावांना धोका मानले जात आहे.