Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Attack: केवळ काश्मीरच नाही तर युरोप आणि इस्लामिक देशही करत आहेत पाकिस्तानच्या दहशतवादाचा सामना

Pahalgam Terrorist Attack : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा ‘दहशतवाद पुरस्कर्ता’ देश म्हणून असलेला चेहरा जगासमोर आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 01, 2025 | 02:15 PM
Not only Kashmir but also Europe and Islamic countries are facing Pakistan's terrorism

Not only Kashmir but also Europe and Islamic countries are facing Pakistan's terrorism

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan terrorism international response : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा ‘दहशतवाद पुरस्कर्ता’ देश म्हणून असलेला चेहरा जगासमोर आला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतर केवळ भारत नव्हे तर अनेक युरोपीय व इस्लामिक देशही पाकिस्तानच्या भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहेत.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतीच केलेली कबुली अत्यंत धक्कादायक ठरली आहे. त्यांनी खुलेपणाने स्वीकारले की, पाकिस्तानने गेल्या तीन दशकांपासून दहशतवाद्यांना आधार दिला आणि पश्चिमी देशांच्या फायद्यासाठी “घाणेरडं काम” केलं आहे. ही कबुली केवळ एक राजकीय विधान नाही, तर पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाचा स्पष्ट पुरावा मानली जात आहे.

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानची थेट भूमिका

काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला मुख्य हल्लेखोर हाशिम मुसा याची ओळख एक माजी पाकिस्तानी पॅरा-कमांडो म्हणून झाली आहे. नंतर तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि भारतात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित झाला होता. त्याला पकडण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा व्यापक शोधमोहीम राबवत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘POK जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युद्ध…’ चीनने रचला पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘मृत्यूचा सापळा’, भारतासाठी आव्हान?

दहशतवादाचा ‘निर्यातदार’ पाकिस्तान

केवळ भारतातच नव्हे, तर अफगाणिस्तान, इराण, रशिया आणि युनायटेड किंग्डम या देशांनाही पाकिस्तानमधून चालणाऱ्या दहशतवादी नेटवर्कचा फटका बसला आहे.

अफगाणिस्तानात, तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचे हल्ले हे पाकिस्तानच्या ISI (इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस) संस्थेच्या मदतीने घडवून आणले गेले आहेत. 2008 मध्ये काबूलमधील भारतीय दूतावासावर झालेला हल्ला आणि 2011 मधील अमेरिकन दूतावासावरचा हल्ला हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे.

ज्येष्ठ पत्रकार कार्लोटा गॉल यांच्या पुस्तकात नमूद केल्यानुसार, हे हल्ले आयएसआयच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या संमतीने आणि देखरेखीखाली झाले होते, जे पाकिस्तानच्या दहशतवादाशी असलेल्या संस्थात्मक संबंधांची पुष्टी करतात.

Terror Trail of Pakistan from Kashmir, Kabul & Beyond !

Haqqani Network, London Bombings, Moscow Concert Hall Attacks , Jaish – ul- Adl etc etc

Pakistani Link to all Major Terror Attacks

World Unite Against Pak Sponsored Terrorism —- #PahalgamTerrorAttack pic.twitter.com/RmRc4wz8Ft

— Siddhant Mishra (@siddhantvm) April 30, 2025

credit : social media

इराणवरही पाकिस्तानमधील अतिरेक्यांचा हल्ला

जैश-उल-अदल नावाची पाकिस्तानस्थित सुन्नी अतिरेकी संघटना इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात सतत हल्ले करत आहे. त्यामुळे इराणने प्रतिउत्तरादाखल पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतावर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केले. इराणने थेट पाकिस्तानवर आरोप केला की, तो या अतिरेक्यांना आश्रय देत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात पूर्ण अपयशी ठरला आहे.

युरोपमध्येही पाकिस्तानचा प्रभाव – लंडन आणि मॉस्को हल्ले

2005 च्या लंडन बॉम्बस्फोटामध्ये सहभागी तीन हल्लेखोरांनी हल्ल्याआधी पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. या घटनेमुळे युनायटेड किंग्डममध्ये पाकिस्तानविरोधी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

एप्रिल 2024 मध्ये मॉस्कोमध्ये झालेल्या हल्ल्याच्या तपासातही हल्लेखोरांच्या पाकिस्तानी नेटवर्कशी संबंध असल्याचे संकेत समोर आले आहेत. ताजिक नागरिक असलेला सूत्रधार पाकिस्तानमधील विचारसरणीने प्रेरित किंवा त्याला पाठिंबा मिळाल्याची शक्यता रशियन तपास यंत्रणांनी दर्शवली आहे.

ओसामा बिन लादेन, पाकिस्तानचा किळसवाणा इतिहास

2011 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला. हा परिसर पाकिस्तानी लष्करी प्रशिक्षण अकादमीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होता. त्यामुळे बिन लादेनला संरक्षण मिळवून देणाऱ्या पाकिस्तानी प्रशासनावर संशयाची शंका अधिकच दृढ झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: भारताकडून हवाई क्षेत्र बंद तर पाकिस्तानकडून जॅमर आणि चिनी ‘ड्रॅगन’ क्षेपणास्त्रांची तैनाती

 दहशतवाद्यांचे आश्रयस्थान म्हणजे पाकिस्तान

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेली कबुली, पहलगामसारखे हल्ले, आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी घटनांमधील सहभाग हे सर्व मिळून पाकिस्तानचा दहशतवादासंदर्भातील ढोंगीपणा उघड करतात. भारत, इराण, अफगाणिस्तान, रशिया आणि युरोप – हे सर्व देश आज एका समान शत्रूशी सामना करत आहेत, आणि तो म्हणजे दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तान. आता आंतरराष्ट्रीय समुदायाने या देशावर कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.

Web Title: Not only kashmir but also europe and islamic countries are facing pakistans terrorism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • Terrorist Activities
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.