'इस्लामिक दहशतवादी कृत्य'; असे का म्हणाले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पॅरिस: फ्रानसच्या मुलहाउस शहरात शनिवारी (22 फेब्रुवारी) एका प्रदर्शनादरम्यान लोकांवर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या देखील समावेश आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी या घटनेला इस्लामी दहशतवादी हल्ला म्हणत या विरोधात कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
कसा घडला हल्ल?
मीडिया रिपोर्टनुसार, मुलहाउस शहरात काँगोच्या समर्थनार्थ एक आंदोलन सुरू होते. यादरम्यान हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने ‘अल्लाहु अकबर’ असे ओरडत चाकूने लोकांवर हल्ला चढवला. हल्लेखोर 37 वर्षाचा असून तो फ्रान्सच्या दहशतवादी संशयितांच्या (FSPRT) यादीत होता. ही यादी 2015 मध्ये चार्ली हेब्दो आणि एका ज्यू सुपरमार्केटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर तयार करण्यात आली होती. या यादीमध्ये संभाव्य कट्टरतावादी लोकांची नोंद केली जाते आणि त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जाते.
हल्लेखोराला फ्रान्समधून हकालपट्टीचा आदेश
सदर हल्लेखोर हा अल्जेरियात जन्मलेला असून त्याला न्यायालयीन देखरेखी खाली ठेवण्यात आले होते. त्याला फ्रान्समधून हाकलून देण्याचा आदेशही देण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरुत सुरक्षा वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. एका पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यावर या हल्लेखोराने हल्ला केला असून अधिकारी गंभीर झाला आहे, आणखी एका अधिकाऱ्याच्या छातीवर वार करण्यात आला आगे. ही माहिती अभियोजक निकोलस हेइट्ज यांनी दिली.
दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू
फ्रानस्च्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी अभियोजन विभागाने (PNAT) या हल्ल्याची चौकशी हाती घेतली आहे. मुलहाउच्या महापौर मिशेल लुत्झ यांनी या घटनेला भयावह म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, अधिकृत चौकशीनंतर याला दहशतवादी हल्ला घोषित केले जाईल.
फ्रान्ससमोरील सुरक्षा आव्हाने
गेल्या काही काळात फ्रान्समध्ये इस्लामी दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रों यांनी या हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हणते देशाच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील, असे नमूद केले. 2015 मध्ये चार्ली हेब्दोवरील हल्ल्यानंतर फ्रान्सने सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या असल्या तरीही अशा घटनांमुळे नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. या हल्ल्यामुळे फ्रान्ससमोर दहशतवादविरोधी लढाईत नवे आव्हान निर्माण झाले आहे. सुरक्षायंत्रणांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून, राष्ट्रीय दहशतवादविरोधी यंत्रणा या हल्ल्यामागच्या कटाची चौकशी करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामधील रुग्णालयात गोळीबार; अनेकजण जखमी






