Hacker Army: उत्तर कोरियाने कशी तयार केली जगातील सर्वात धोकादायक 'हॅकर आर्मी'? बायनान्स हॅकिंग प्रकरणाने जगात खळबळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
सायबर सुरक्षेच्या जगात सध्या एकाच बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे उत्तर कोरियाची अत्यंत गुप्त आणि तितकीच धोकादायक ‘हॅकर आर्मी’ (Hacker Army). नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, बायनान्स (Binance) या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजवर झालेल्या ६.३ अब्ज डॉलर्सच्या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचा दावा एफबीआय (FBI) आणि आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थांनी केला आहे. उत्तर कोरियासारखा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला देश जगातील सर्वात प्रगत देशांमधील डिजिटल तिजोऱ्यांवर डाका कसा टाकतो, हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे.
उत्तर कोरियातील हॅकर्सच्या या सैन्यामागे कोणतीही अचानक झालेली किमया नसून, अनेक वर्षांचे नियोजनबद्ध धोरण आहे. २००४ मध्ये उत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात शरण आलेले माजी हॅकर ट्रेनर किम ह्युंग-क्वांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सायबर वॉरफेअरला त्यांच्या अण्वस्त्रांइतकेच महत्त्व देतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण पाकिस्तानचे राजकारण अडचणीत, असिम मुनीर यांना नेमकी भीती कशाची?
उत्तर कोरियात दरवर्षी शालेय स्तरावरून (सुमारे ११ ते १२ वर्षे वयाच्या) सर्वात हुशार १५० ते २०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना विशेष अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आणि देशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये संगणक शास्त्र, प्रगत गणित, परदेशी भाषा आणि अत्याधुनिक क्रिप्टो सिस्टीमचे शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांवर सैनिकांप्रमाणेच कडक नियम आणि शिस्त लादली जाते.
दक्षिण कोरियाच्या इंटेलिजन्स सर्व्हिसच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाकडे सध्या सुमारे ८,००० हून अधिक सायबर कमांडोज कार्यरत आहेत. हे हॅकर्स केवळ उत्तर कोरियातच नाही, तर चीन, रशिया आणि इतर मित्र देशांमध्ये राहून डिजिटल कारवाया करतात. लॅझारस ग्रुप (Lazarus Group) आणि ट्रेडरट्रेडर (TraderTraitor) यांसारख्या कुख्यात सायबर गटांचा संबंध थेट उत्तर कोरियाच्या लष्करी गुप्तचर संस्थेशी जोडला जातो.
क्रिप्टो जगतातील सर्वात मोठा दरोडा मानला जाणारा ६.३ अब्ज डॉलर्सचा बायनान्स हॅक हा उत्तर कोरियाच्या हॅकिंग क्षमतेचा एक मोठा पुरावा मानला जात आहे. रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाई हॅकर्सनी एका इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये फेक जॉब इंटरव्यू आणि मालवेअरच्या (Malicious Software) साह्याने प्रवेश मिळवला आणि काही मिनिटांत अब्जावधी डॉलर्सची रक्कमेची अफरातफर केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Paraguay Crisis : ‘आमचे पैसे परत द्या!’ बँकिंग संकटामुळे पॅराग्वे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती; राष्ट्रपतींना सोडावे लागले पद
उत्तर कोरिया सरकार या अशा हॅकिंग मोहिमांना मोठा राष्ट्रीय विजय मानते. यशस्वी हॅकर्सना राजधानी प्योंगयांगमध्ये आलिशान फ्लॅट्स, रोख अमेरिकी डॉलर्स, परदेशात फिरण्याची सवलत आणि सत्ताधारी पक्षात महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यामुळे या हॅकर्ससाठी हॅकिंग हे केवळ काम नसून ते देशासाठी दिलेले योगदान ठरवले जाते.
उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. अशा परिस्थितीत, देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी निधी उभारण्यासाठी उत्तर कोरिया सायबर चोऱ्यांचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोप अमेरिका, ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देश सातत्याने करत आहेत. ही हॅकर आर्मी येत्या काळात जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी आणखी मोठा धोका निर्माण करू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Ans: अहवालानुसार, उत्तर कोरियाच्या सायबर वॉरफेअर आणि हॅकर टीममध्ये सुमारे ८,००० हून अधिक प्रशिक्षित लोक काम करतात.
Ans: उत्तर कोरियातील शाळांमधून ११ ते १२ वयाच्या सुमारे १५० ते २०० अतिशय हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संगणक आणि सायबर सुरक्षेचे कठोर लष्करी प्रशिक्षण दिले जाते.
Ans: आंतरराष्ट्रीय तपास संस्था (FBI) आणि क्रिप्टो विश्लेषकांच्या मते, बायनान्सवरील ६.३ अब्ज डॉलर्सच्या सायबर हल्ल्यामध्ये उत्तर कोरियाच्या 'ट्रेडरट्रेडर' आणि 'लॅजारस' या हॅकर गटांचे संकेत सापडले आहेत.






