Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी

Pakistan Train Accident : पाकिस्तानात मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे खैबर पख्तुनख्वामध्ये मुसळधार पाऊस आणि पूरामुळे विध्वंस झाला आहे. दुसरीकडे पंजाब प्रांतात भीषण रेल्वे अपघात घडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 17, 2025 | 01:58 PM
one killed more than 20 injured in train accident in Pakistan's Lahore

one killed more than 20 injured in train accident in Pakistan's Lahore

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात भीषण रेल्वे अपघात
  • अपघातात १ चा मृत्यू २० हून अधिक जखमी
  • खैबर पख्तुनख्वामध्ये मुसळधार पाऊस आणि पूरामुळे विध्वंस

Pakistan Train Accident news in Marathi : इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वामध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने हाहा:कार माजवला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पुन्हा एक भीषण रेल्वे अपघात (Train Accident) घडला आहे. रविवारी सकाळी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये प्रवासी ट्रेनचे ४ डबे रुळावरुन घसरले.

या भीषण अपघातात एका प्रवाशाच्या मृत्यू तर २० जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून यातील २ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये प्रवाशांनी भरलेली एक ट्रेन लोधरान रेल्वे स्थानकाजवळ रुळावरुन घसरली.

ही ट्रेन पेशावरहून कराचीला रवाना झाली होता. यावेळी हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आतापर्यंत १९ जणांना वाचवण्यात आले आहे. अपघातानंतर पेशावर-कराचीचा हा मार्ग काही तासांसाठी बंद होता. सध्या रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

यापूर्वी देखील पाकिस्तानमध्ये भीषण अपघात

यापूर्वी देखील पाकिस्तानमध्ये अनेक रेल्वे अपघात घडले आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये इस्लामाबाद एक्सप्रेसचा रेल्वे रुळावरुन घसरुन अपघात झाला होता. यामध्ये ३० लोक जखणी झाल्याचे वृत्त मिळाले होते. तसेच गेल्या सोमवारी मुसा पाक एक्सप्रेसचाही अपघात झाला होता. या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले होते.

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहा:कार

याच वेळी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात मुसळधार पावसामुळे आणि पूरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोक पूरात वाहून गेले आहेत. तसेच गेल्या ४८ तासांत मृतांचा आकडा ३२७वर पोहोचला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या बुनेर, शांगला, मानसेहरा, बाजौर, स्वात, बट्टाग्राम, लोअर दिर, अबोटाबाद हे जिल्ह्ये प्रभावित झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्येही (POK) पाऊस आणि पूराममुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरे, वाहने, शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ हजार बचाव कर्मचारी सध्या सक्रिय आहेत. पण ही मदतही अपुरी पडत आहे. पाकिस्तान ९ जिल्ह्यांमध्ये मदत पोहोचवणे अत्यंत कठीण होत आहे. अनेक भागामध्ये भूस्खलन आणि पूरामुळे मदत कार्य पोहोचण्यात अडचणी येत आहे. बंद रस्ते आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

Web Title: One killed more than 20 injured in train accident in pakistans lahore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • Pakistan News

संबंधित बातम्या

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
1

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Zardari Kashmir Speech : झरदारींचा पुन्हा काश्मीरवर विषारी प्रहार; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतावर खोटारडे आरोप
2

Zardari Kashmir Speech : झरदारींचा पुन्हा काश्मीरवर विषारी प्रहार; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतावर खोटारडे आरोप

Karachi Aerial Firing : पाकिस्तानमध्ये हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक जखमी
3

Karachi Aerial Firing : पाकिस्तानमध्ये हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक जखमी

Pakistan airspace crores loss : पाकिस्तानचं निघालं दिवाळं! भारताला हवाई क्षेत्र बंद केल्याने झाले कोट्यवधींचे नुकसान
4

Pakistan airspace crores loss : पाकिस्तानचं निघालं दिवाळं! भारताला हवाई क्षेत्र बंद केल्याने झाले कोट्यवधींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.