Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan Flood News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून हा आकडा ३२७ पर्यंत पोहोचले आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
गेल्या २४ तासांत पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रदेशात १५४ जणांचा आणि पाव्याप्त काश्मीरमध्ये (POK) ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मतांच्या आकड्या वाढ होण्याची भीती बचाव अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
आतापर्यंत इतक्या लोकांचा मृत्यू
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या अखेरीस मान्सूला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत ६४५ नागरिक मृत पावले आहेत. विशेष करुन खैबर पख्तुनख्वामध्ये डोंगळराळ भागामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे पाकिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामन खात्याने तीव्र पावसाचा इशारा दिला आहे.
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत ढगफुटींच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पुराचा प्रवाह वाढला आहे. आतापर्यंत ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या बुनेर, शांगला, मानसेहरा, बाजौर, स्वात, बट्टाग्राम, लोअर दिर, अबोटाबाद हे जिल्ह्ये प्रभावित झाले आहेत. सध्या पूरग्रस्तांसाठी मदत आणि पुनर्वंसनाचे निर्देश आपत्कालीन सेवांना देण्यात आले आहेत.
PoK मध्ये प्रचंड नुकसान
पाकव्यपात काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. POK च्या गिलगट-बाल्टिस्तानमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. पावसामुळे अनेक घरे, वाहने, शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नीलम खोऱ्यातील पर्यटन भागामध्येही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ हजार बचाव कर्मचारी सध्या सक्रिय आहेत. पण ही मदतही अपुरी पडत आहे. पाकिस्तान ९ जिल्ह्यांमध्ये मदत पोहोचवणे अत्यंत कठीण होत आहे. अनेक भागामध्ये भूस्खलन आणि पूरामुळे मदत कार्य पोहोचण्यात अडचणी येत आहे. बंद रस्ते आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.