पुतिनने केला ट्रम्पचा पर्दाफाश! भारताला धमकावून अमेरिकेला स्वतः करायचाय रशियासोबत व्यापार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US-India Relations : गेल्या काही महिन्यात अमेरिका (America) आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण आहे. यामागाचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लागू केलेले टॅरिफ आहे. ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लागू केले आहे.
रशियाकडून तेल खरेदी करुन युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला (Russia Ukraine War) मदत करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मात्र याच वेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिका आणि रशियाच्या व्यापारामध्ये प्रचंड वाढ केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही देशांनी व्यापार २०% ने वाढला आहे. यामुळे अमेरिकेचे दुटप्पी धोरण उघड झाले आहे. अलास्कामधील परिषेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनीच हा खुलासा केला आहे. परिषदेत त्यांना अमेरिकेसोबतच्या व्यापारवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेत नवे प्रशासन आल्यापासून द्विपक्षीय व्यापारात वाढ झाली असल्याचे म्हटले.
हा व्यापार प्रतीकात्मक स्वरुपात असून याचा दर २० टक्क्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यावरुन अमेरिका आणि रशियामध्ये व्यापारवाढ होत आहे. यामध्ये डिजिटल, उच्च तंत्रज्ञा आणि अवकाश क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.
India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
pic.twitter.com/3oEfsqxlaq
US- Russia bilateral gas trade grew by 20% as per Putin
China accounts for 32% of Russia’s export market
EU’s 62% mineral fuel import is from Russia
EU’s LNG imports from Russia hit a record 17.8 million tonnes in 2024
But guess who is left holding the…— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) August 16, 2025
अमेरिकेच्या या दुटप्पी धोरणावर भारताने नाराजी व्यक्ती केली आहे. पुतिन यांच्या मते अमेरिका-रशिया गॅस व्यापारात २०% वाढ झाली. तसेच चीनने रशियामध्ये ३२% गुंतवणूक केली आहे. युरोपियन देशांनीही रशियासोबतचा व्यापार ६२% पर्यंत नेला आहे. २०२४ मध्ये तर युरोपियन देशांनी LNG १७.८ टक्के दशलक्ष टन रशियाकडून आयात केला होता. अशा परिस्थितीत भारतावर टॅरिफचा (Tarrif) बोजा टाकून रशियाशी व्यापार संबंध तोडायला लावणे ही दडपशाही आहे.
भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध केला असून, युरोपियन देश, अमेरिका रशियाशी व्यापर करत आहेत, तसेच चीनसारखे देश तेल खरेदी करत आहे. पण यांच्यावर कोणतेही निर्बंध लादले जात नाही. पूर्ण अन्याकारक आणि अमान्य आहे. मात्र यामुळे भारत आणि अमेरिका संबंधामध्ये तणाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी