Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi Govt: माफियांची उलटगणती सुरू! सलीम डोलाचे प्रत्यार्पण; ‘Operation Global Hunt’ने उडवली आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची झोप

Operation Global Hunt : 'ऑपरेशन ग्लोबल हंट'च्या माध्यमातून, भारतीय यंत्रणा परदेशात लपून बसलेल्या फरार माफिया, अमली पदार्थ तस्कर आणि गुंडांना पकडण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 01, 2026 | 06:33 PM
operation global hunt salim dola extradited turkey 2026 news

operation global hunt salim dola extradited turkey 2026 news

Follow Us
Follow Us:
  • सलीम डोलाचे प्रत्यार्पण
  • १०० पेक्षा जास्त ड्रग सिंडिकेट्सवर निशाणा
  • ‘झिरो टॉलरन्स’ धोरण

Mohammad Salim Dola arrested Turkey 2026 : भारतात गुन्हे करून परदेशात लपून बसलेले गुन्हेगार, माफिया आणि अंमली पदार्थ तस्कर यांच्याविरोधात भारतीय तपास यंत्रणांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय मोहीम उघडली आहे. ‘ऑपरेशन ग्लोबल हंट’ (Operation Global-Hunt) असे या मोहिमेचे नाव असून, याद्वारे परदेशात बसून भारतातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या ड्रग सिंडिकेट्सच्या मुळावर घाव घातला जात आहे. या मोहिमेमुळे आता फरार गुन्हेगारांना त्यांची गुन्हेगारी कृत्ये लपवणे अशक्य होणार आहे.

सलीम डोलाचे यशस्वी प्रत्यार्पण: एक ऐतिहासिक यश

या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया मोहम्मद सलीम डोला याचे प्रत्यार्पण होय. ५९ वर्षीय सलीम डोला याला तुर्कीमधील इस्तंबूल येथून विशेष मोहिमेद्वारे भारतात आणण्यात आले. डोला याच्यावर भारतात अनेक अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल होते आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. मार्च २०२४ मध्ये इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (Red Notice) जारी केली होती. डोलाच्या अटकेमुळे हे स्पष्ट होते की, भारतीय यंत्रणा आता केवळ भारतात बसून तपासाची वाट पाहणार नाही, तर सातासमुद्रापार जाऊन गुन्हेगारांना पकडण्यात येईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files: काबाच्या पवित्र कापडाचा एपस्टाईनने ‘असा’ केला वापर; बेटावरील ‘मशीद’ आणि सौदी राजघराण्याच्या संबंधाचे रहस्य उघड

काय आहे ‘ऑपरेशन ग्लोबल हंट’ची रणनीती?

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने एक ३ वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. या मोहिमेअंतर्गत एनआयए (NIA), ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि एनसीबी या सर्व केंद्रीय यंत्रणा इंटरपोल आणि इतर जागतिक गुप्तचर संस्थांच्या समन्वयाने काम करत आहेत. परदेशात बसून भारतात अमली पदार्थ, सायबर गुन्हे, आणि आर्थिक घोटाळे करणाऱ्या सुमारे १०० मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना टार्गेट केले जात आहे.

या मोहिमेत केवळ प्रत्यार्पण प्रक्रियेवर अवलंबून न राहता, गुन्हेगारांची परदेशातील संपत्ती गोठवणे आणि त्यांना विशेष विमानांद्वारे थेट भारतात आणून खटला चालवणे यावर भर दिला जात आहे. यामध्ये सिल्व्हर नोटीसचा वापर करून संशयितांवर बारीक नजर ठेवली जात आहे.

#WATCH | Kargil | Union Home Minister Amit Shah says, “We want this border region to become self-reliant… The entire country knows about the history of Bharat Scouts, from Kashmir to Kanyakumari and from Dwarka to Kamakhya. Every citizen of India admires and appreciates the… https://t.co/DniagsA77X pic.twitter.com/lGHTda39UV — ANI (@ANI) May 1, 2026

credit – social media and Twitter

कुख्यात गुन्हेगारांची यादी आणि अमली पदार्थांचा विळखा

तपास यंत्रणांच्या रडारवर अनेक मोठी नावे आहेत, ज्यामध्ये आसिफ इक्बाल मेमन, हाजरा इक्बाल मेमन, जुनेद इक्बाल मेमन, हरमीत सिंग, प्रदीप सिंग, परमजीत धालीवाल, सनी गोसाल्विस, जसविंदर सिंग, टिसन बिश्नोई, हाजी सलीम आणि संदीप धुनिया यांसारख्या गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांनी केवळ भारतातच नव्हे, तर दुबई, कॅनडा आणि युरोपमध्ये आपले जाळे पसरवले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Heritage: देशाचे वैभव परतले! कोहिनूर वादाच्या पार्श्वभूमीवर महासत्तेकडून भारताला मोठी भेट; 657 प्राचीन कलाकृतींची घरवापसी

सरकारी आकडेवारीनुसार, २०२५ च्या एका वर्षात सुमारे १,३३,००० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांचे बाजारमूल्य २,००० कोटींपेक्षा जास्त आहे. ‘ऑपरेशन ग्लोबल हंट’ सुरू झाल्यापासून अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा आळा बसला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑपरेशन ग्लोबल हंट कशाशी संबंधित आहे?

    Ans: ही मोहीम प्रामुख्याने परदेशात लपून बसलेल्या १०० हून अधिक भारतीय अंमली पदार्थ तस्कर आणि गुन्हेगारांना भारतात आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

  • Que: ही मोहीम प्रामुख्याने परदेशात लपून बसलेल्या १०० हून अधिक भारतीय अंमली पदार्थ तस्कर आणि गुन्हेगारांना भारतात आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

    Ans: तो दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आहे, ज्याला तुर्कीमधून भारतात आणले गेले आहे.

  • Que: या मोहिमेत कोणकोणत्या संस्था सहभागी आहेत?

    Ans: यामध्ये एनसीबी, सीबीआय, ईडी, एनआयए आणि इंटरपोल यांचा संयुक्त सहभाग आहे.

Web Title: Operation global hunt salim dola extradited turkey 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Drug Mafia
  • India news
  • terrorist
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार
1

Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार

US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान
2

US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान

ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?
3

ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल
4

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.