Pahalgam Terror Attack India Slams Pakistan As 'Rogue State' At The UN, know the details
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात कडक कारवाई केली. यानंतरही पाकिस्तानमधून दहशतवादाला पाठिंबा देणारी विधाने समोर येत आहे.याच दरम्यान भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये चांगलेच फटकारले आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले आहे. योजना पटेल यांनी म्हटले की, ‘पाकिस्तान हा एक दुष्ट आणि दहशतवादाला आश्रय देणार देश आहे.’ आपल्या या वक्तव्याच्या पाठ पुरावा करताना त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी स्वत: कबूल केले आहे की, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देतो. यावरुन हे स्पष्ट होते की, पाकिस्तान हा दहशतवादला प्रोत्साहन देतो, यापेक्षा आणखी काय पुरावा हवा, असे योजना पटेल यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले.
#WATCH | Ambassador Yojna Patel, India’s Deputy Permanent Representative at the UN says, “The Pahalgam terrorist attack represents the largest number of civilian casualties since the horrific 26/11 Mumbai attacks in 2008. Having been a victim of cross-border terrorism for… pic.twitter.com/ltwQxJN2iP
— ANI (@ANI) April 29, 2025
UN च्या दहशतवादविरोधी बैठकीमध्ये बोलताना योजना पटेल यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी मान्य केले आहे की, पाकिस्तान दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देतो. यामुळे हे स्पष्ट होते की, पाकिस्तान दहशतवाद पसरवणार देश आहे. यामुळे जगाने आता या धोक्यापासून पाठ फिरवू नये. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम येथे झालेल्या हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. यामध्ये अनेक लोकांचा बळी गेला.
तसेच योजना पटेल यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताला पाठिंबा दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांचे आभार मानले. तसेच त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले की, एका देशाच्या प्रतिनिधींनी व्यासपीठाचा गैरवापर केला, भारतावर गंभीर आणि खोटे आरोप केले. भारत दहशतवादांच्या बळींना विसरणार नाही आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करेल.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी स्काय न्यूज ला दिलेल्या एका मुलाखतीत कबूल केले होते की, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देतो. त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आणि दहशतवाद्यांना निधी देण्याचा गेल्या अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे. त्यांनी म्हटले होते की, “आम्ही गेल्या 30 वर्षापासून अमेरिकेसाठी हे घाणरेडे काम करत आहोत.”