PAK honoured US General Kurilla with country's biggest military honour, Nishan-e-Imtiaz.
इस्लामाबाद : अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात जवळीक वाढत आहे. नुकतेच अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावर क्लीन चीट दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी धोरणांचे कौतुक केले आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानदेखील अमेरिकेशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच पाकिस्तानने अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याचा सन्मान केला आहे. मात्र दोन्ही देशांतील वाढती जवळीक भारतासाठी धोक्याची बाब मानली जात आहे.
पाकिस्तानने अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकेल कुरिला यांना देशाचा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान केला आहे. कुरिल्ला यांना पाकिस्तानचा निशान-ए-इम्तियाज सन्मान दिला आहे. इस्लामाबाद राष्ट्रपती भनवनातील समारंभात हा सन्मान पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या हस्ते देण्यात आला.
कुरिल्ला यांना प्रादेशिक शातता स्थापित करण्यासाठी आणि पाकिस्तान अमेरिका लष्करी संबंध मजबूक करण्यासाठी हा सन्मान मिळाल. यावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची जनरल कुरिल्ला यांनी भेट घेतली. यावरुन पाकिस्तान अमेरिकेप्रती आपली निष्ठ व्यक्त करत असल्याचे दिसून येते असे म्हटले जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडी भारतासाठी वाढता धोका आहे. सध्या यावर भारताचे अत्यंत बारकाईने लक्ष आहे.
दरम्यान कुरिल्ला यांनी दहशतवादविरोधी लढाईचे कौतुक करत पाकिस्तानला एक मजबूत मित्र म्हटले आहे. तसेच त्यांनी पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांशी अमेरिकेला संबंध ठेवावे लागतील असेही म्हटले. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांशी चांगले संबंध अमेरिकेसाठी फायदेशीर राहिले पाहिजेत. दरम्यान पाकिस्तानने हे पाऊल अशा वेळी उचचले आहे, जेव्हा पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना रोखण्यात अपयशी होत आहे आणि जागतिक स्तरावर पाकिस्तानवर दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे.
शिवाय पाकिस्तानने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे, जेव्हा पाकिस्तानला आर्थिक संकट आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF)च्या दबावाला सामोरे जावेल लागत आहे. तसेच अमेरिका FATFचा संस्थापक सदस्य आहे, यामुळे अमेरिकेशी संबंध सुधारुन पाकिस्तान (FATF)कडून आर्थिक मदत मिळवू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिका FATF मध्ये संघटनेची धोरणे आणि दहशतवादी निधीवर लक्ष ठेवते.
याच वेळी पाकिस्तान दहशतवादी निधी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामुळे पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले जाण्याची शक्यता आहे. मात्र अमेरिकेशी जवळीक वाढवल्यास पाकिस्तान यातून दूर राहू शकते असा विश्वास येथील अधिकाऱ्यांना आहे. यामुळेच पाकिस्तान अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहे.