पाठीत चाकूचे वार, मनगट कापले अन्...; ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा भारतीयावर प्राणघातक हल्ला (फोटो सौजन्य: iStock)
कॅनाबेरा : पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नयेथे एका भारतीय वंशाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. मेलबर्नच्या एका शॉपिंग सेंटरबाहेर ही घटना घडली. ३३ वर्षीय सौरभ आनंदवर काही लोकांनी चाकूने गंभीर वार केले. सध्या सौरभ गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
स्थानिक वेळेनेनुसार, संध्याकाली ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी सौरभ अल्टोन मेडोजधील सेंट्रल स्क्वेअर शॉपिंग सेंटरजवळील फार्मसीमधून औषध घेण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा एका मित्राशी फोन सुरु होता. अचानक त्याच्या पाच मुलांना चाकून वार करण्यास सुरुवात केली. सध्या या घटनेने ऑस्ट्रेलियाती भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतीयांकडून न्यायाची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील तरुणाने सौरभचे खिस तपासरले आणि नंचर त्याला बुक्की मारुन खाली पडले. तिसऱ्या एकाने त्याच्या मानेवर चाकून ठेवला. हल्लेखोरांनी सौरभचे हात, मनगट आणि हाडांवर वार केला. सौरभच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा हात जवळजवळ पूर्ण कापला गेला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
तसचे त्याच्या पाठीवर, खाद्यांवर चाकूच्या जखमा आहेत. याशिवाय मणक्यात देखील फ्रॅक्चर आहे. हाताची अनेक हाडे तुटली असून डोक्यालाही गंभीर जखम झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या यासंबंधी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच हल्लेखोरांपैकी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोन आरोपी १४ वर्षांचे आणि इतर दोन १५ वर्षांचे आहेत. या सर्व अल्पवयीन आरोपींवर गंभीर दुखापत, दरोडा आणि बेकायदेशीर हल्ला केल्याचे आरोप आहेत. ऑगस्टमध्ये या प्रकरणावर न्यायालयाच खट चालवला जाणार आहे. यातील दोन आरोपींना जामीन मिळाल्याने सौरभने दु:ख व्यक्त केले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.
या हल्ल्याच्या ४ दिवसांपूर्वी देखील ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरात एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला करण्यात आला होता. चरणप्रीत सिंग असे या विद्यार्थ्याचे नाव होते. कार पार्किंगवरून त्याचा स्थानिकांशी वाद झाला होता. त्याला शिवीगाळ करण्यात आली आणि हिंसक हल्लाही करण्यात आला होता. भारतात पळून जाण्यास त्याला सांगितले जात होते. चरणप्रीत बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली होती.