Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप

Maduro Arrested : कमला हॅरिस यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांच्यावरील अमेरिकेच्या कारवाईला "बेकायदेशीर" म्हटले आहे. या कारवाईमुळे अमेरिका अधिक सुरक्षित किंवा मजबूत होणार नाही असे त्या म्हणाल्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 04, 2026 | 11:03 AM
American families will pay the price Kamala Harris condemns Maduro's arrest citing Trump's wishes

American families will pay the price Kamala Harris condemns Maduro's arrest citing Trump's wishes

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी मादुरो यांच्या अटकेला “बेकायदेशीर आणि मूर्खपणाची” कृती म्हटले असून, यामुळे अमेरिका अधिक असुरक्षित होईल असा इशारा दिला आहे.
  • ही कारवाई लोकशाहीसाठी नसून केवळ ‘तेल’ आणि ट्रम्प यांच्या ‘महाशक्ती’ बनण्याच्या इच्छेसाठी आहे, असा थेट आरोप हॅरिस यांनी केला आहे.
  •  न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी याला “युद्धाचे कृत्य” (Act of War) संबोधून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे.

Kamala Harris statement on Nicolas Maduro arrest : अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) आणि त्यांच्या पत्नीला ज्या पद्धतीने बेडरूममधून खेचून अटक केली, त्यावरून आता अमेरिकेतच दोन गट पडले आहेत. एकीकडे रिपब्लिकन पक्ष याला विजय मानत असताना, दुसरीकडे माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “ही कारवाई अमेरिकन कुटुंबांना महागात पडेल आणि यामुळे देशात महागाई आणि अराजकता वाढेल,” असा इशारा हॅरिस यांनी दिला आहे.

“ही कृती बेकायदेशीर आणि शहाणपणाची नाही”

कमला हॅरिस यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून ट्रम्प प्रशासनाचा तीव्र निषेध केला. त्या म्हणाल्या, “मादुरो हा क्रूर हुकूमशहा असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण आंतरराष्ट्रीय कायदा पायदळी तुडवावा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कृतीमुळे अमेरिका अधिक सुरक्षित किंवा मजबूत होणार नाही. आपण इतिहासात आधीही पाहिले आहे की, राजवट बदलण्याच्या नावे लढलेली युद्धे शक्तीप्रदर्शन म्हणून सुरू होतात, पण त्याचा शेवट केवळ विनाशात आणि सामान्य अमेरिकन कुटुंबांच्या आर्थिक ओझ्यात होतो.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested : ‘कायर लोकांनो या…’ मादुरोचं चॅलेंज ट्रम्पने स्वीकारलं, सहपत्नीक घातल्या बेड्या; व्हेनेझुएलात आता अमेरिकन राजवट

लोकशाहीचा केवळ मुखवटा, खरा हेतू ‘तेल’!

हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवताना सांगितले की, ही कारवाई ड्रग्ज किंवा लोकशाही वाचवण्यासाठी केलेली नाही. “हे केवळ व्हेनेझुएलातील तेलावर ताबा मिळवण्यासाठी आणि ट्रम्प यांना ‘प्रादेशिक महासत्ता’ (Regional Powerhouse) म्हणून सिद्ध करण्यासाठी सुरू आहे. जर ट्रम्प यांना खरोखरच लोकशाहीची काळजी असती, तर त्यांनी ड्रग्ज तस्करांना माफी दिली नसती. ते केवळ आपल्या सैनिकांचा जीव धोक्यात घालत आहेत आणि अब्जावधी डॉलर्स वाया घालवत आहेत,” असा सडेतोड आरोप त्यांनी केला.

Kamala Harris issues statement on the actions of Donald Trump’s administration in Venezuela. “Donald Trump’s actions in Venezuela do not make America safer, stronger, or more affordable. That Maduro is a brutal, illegitimate dictator does not change the fact that this action… pic.twitter.com/y7LNS1Dpdn — Pop Flop (@ThePopFlop) January 4, 2026

credit : social media and Twitter

न्यूयॉर्कमध्येही विरोधाची लाट: जोहरान ममदानी आक्रमक

केवळ हॅरिसच नव्हे, तर न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनीही या कारवाईला “युद्धाचे कृत्य” म्हटले आहे. ममदानी यांनी स्पष्ट केले की, या एकतर्फी कारवाईमुळे न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या हजारो व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “हा फेडरल आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग आहे. यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होईल आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील,” असे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली

कमांडो ऑपरेशनचा थरार: ३० मिनिटांत खेळ खल्लास!

सीएनएनच्या अहवालानुसार, अमेरिकन सैन्याच्या डेल्टा फोर्सने (Delta Force) अत्यंत गोपनीयतेने ही मोहीम राबवली. कराकसमधील ‘फोर्ट ट्युना’ या कडक सुरक्षा असलेल्या लष्करी संकुलात कमांडो घुसले. मादुरो आणि त्यांची पत्नी झोपलेले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे ऑपरेशन अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण झाले आणि यात एकही अमेरिकन सैनिक जखमी झाला नाही. मात्र, या कारवाईने जागतिक राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कमला हॅरिस यांनी मादुरोच्या अटकेला विरोध का केला?

    Ans: हॅरिस यांच्या मते, ही कारवाई बेकायदेशीर असून यामुळे अमेरिका सुरक्षित होणार नाही, उलट तेलाच्या राजकारणामुळे अमेरिकन कुटुंबांवर महागाईचे ओझे वाढेल.

  • Que: जोहरान ममदानी यांनी या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी याला "युद्धाचे कृत्य" (Act of War) म्हटले असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.

  • Que: अमेरिकन सैन्याने मादुरोला कसे पकडले?

    Ans: अमेरिकन सैन्याच्या डेल्टा फोर्सने रात्रीच्या वेळी 'फोर्ट ट्युना' संकुलात धाड टाकून ३० मिनिटांत मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले.

Web Title: American families will pay the price kamala harris condemns maduros arrest citing trumps wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • Kamla harris
  • Nicholas Maduro
  • Venezuela

संबंधित बातम्या

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…
1

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?
3

Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?

US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?
4

US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.