Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Explainer : पाक-अफगाण तणाव शिगेला! दोन्ही देशांची एकमेकांना युद्धाची उघड धमकी, कोण जिंकेल?

Pak-Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. दोन्ही देशातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्या असल्याने तीव्र युद्धाची भीती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना खुली धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 09, 2025 | 08:23 PM
Pak-Afghan War

Pak-Afghan War

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला
  • युद्ध सुरु झाल्यास कोण जिंकेल
  • मुनीरचे सैन्य तालिबानला हरवू शकेल का?
Pak-Afghan War : इस्लामाबाद/ काबूल : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan) तणाव आता शिगेला पोहोचला आहे. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये झालेली तिसरी शांतता चर्चा देखील अयशस्वी ठरली आहे. यामुळे दोन्ही देशात तीव्र संघर्ष सुरु होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकतेच तालिबानने पाकिस्तानवर शांतता चर्चेत अडथळा आणल्याचे आरोप करत युद्धाची धमकी दिली होती, तर पाकिस्तानचे असीम मुनीर यांनी देखील याला खुले आव्हान दिले आहे.

Pak-Afghan War : तर युद्ध होईल….; इस्तंबूल बैठकीपूर्वी पाक संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला उघड धमकी

का सुरु आहे दोन्ही देशात तणाव

गेल्या महिन्यात ड्युरंड रेषेवर दोन्ही देशात चकामक झाली होती. यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केल्याचा आरोप केला. यामुळे दोन्ही देशांतील शांत झालेला तणाव पुन्हा उफाळला. यापूर्वी २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव होता. यामुळे अनेकदा दोन्ही देशांत ड्युरंड रेषेवर सतत संघर्षही होत असतो. परंतु यावेळी हा तणाव अधिक वाढला आहे.

लष्करी ताकदीच्या बळावर पाकिस्तान अधिक शक्तीशाली

सध्याची परिस्थिती पाहता युद्ध छिडण्याची शक्यता आहे. यामुळे युद्ध सुरु झाल्यास कोण जिंकेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन्ही देशांची लष्करी ताकद पाहिली तर पाकिस्तान तालिबानपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. पाकिस्तानकडे आधुनिक शस्त्रे, हवाई दल, आणि अण्वस्त्र देखील आहे. परंतु काही तज्ज्ञांच्या मेत, दोन्ही देशातील दीर्घकाली संघर्ष पाहिला तर यामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानसमोरील आव्हाने

धार्मिक आव्हान                       

या युद्धात पाकिस्तानसमोर दोन सर्वात मोठी आव्हाने आहेत ती म्हणजे एक धार्मिक आणि राजकीय वैधतेचा अभाव. तालिबान स्वत:ला इस्लामाचा खरा रक्षक मानतो, तर पाकिस्तान खोट्या इस्लामिक प्रचार करतो असा आरोप आहे. तसेच पाकिस्तानने आतापर्यंत तालिबानसोबच्या युद्धांना धार्मिक रुप देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजनूही तोच मार्ग अवलंबवण्याची शक्यता आहे. परंतु यावेळी त्यांच्यासमोर स्वत:ला इस्लामचा खरा रक्षक मानणारा तालिबान उभा आहे, यामुळे या युद्धाला धार्मिक वळण देणे पाकिस्तानला कठीण ठरण्याची शक्यता आहे.

राजकीय आव्हान

पाकिस्तानची राजकीय परिस्थितीत देखील अत्यंत कमी आहे. गेल्या अनेक काळापासून पाकिस्तानची सत्ता लष्कराच्या हाती असल्याचे सांगितले जाते. सध्या पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पीटीआय, अवामी नॅशनल पार्टी
आणि पख्तूनख्वां मिल्ली अवामी पार्टी हे पक्ष आहेत.

या पक्षांनी अफगाणिस्तान विरुद्ध युद्धाला नकार दिला आहे. दुसरीकडे अंतर्गत संघर्षामुळे खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानचे नागरिक अफगाण लोकांशी सामाजिक आणि व्यापारामुळे जोडले गेलेल आहेत. यामुळे स्थानिक लोकांचा पाठिंबा पाकिस्तान शहबाज सरकार किंवा लष्कराला मिळणे अशक्य आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानची राजकीय ताकद अधिक मजबूत आहे.

आणखी काही आव्हाने

  • सध्या पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. महागाई, कमी होणार परदेशी गुंतवणूक आणि राजकीय अस्थिरता यामुळे युद्धाचा भार पाकिस्तान पेलू शकणार नाही.
  • दुसरीकडे अफगाणिस्तानची आर्थिक ताकद कमी आहे. परंतु गेल्या काही काळात तालिबान सरकार परदेशी राष्ट्रांशी संबंध वाढवत आहेत. तसेच परकीय गुंतवणूकीसाठी इतर देशांना आवाहन करत आहेत.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहता दोन्ही देशांना फारसा पाठिंबा नाही.
  • दोन्ही देशांचा भूभाग पाहिला तर अफगाणिस्तान दुर्गम भागात आहे. यामुळे लष्करी कारवाई करणे कठीण जाईल. तर पाकिस्तानवर सहज हल्ला करता येईल.
यामुळे पाकिस्तानकडे शक्तिशाली सेना असली तर तालिबानसोबतच्या युद्धात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला, सामाजिक एकतेला आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो. केवळ संवादाच्या मार्गानेच दोन्ही देशातील तणाव कमी होण्याची शक्यात आहे.

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप

Web Title: Pakistan afghanistan war pak afghan tensions rises as peace talks between this countries in vain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका
1

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका

नायजेरियातील मशिदीत आत्मघातकी हल्ला ; स्फोटात किमान ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2

नायजेरियातील मशिदीत आत्मघातकी हल्ला ; स्फोटात किमान ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

ऑस्ट्रेलियात पुन्हा हिंसाचार! मेलबर्नमध्ये ख्रिसमसच्या पहाटे फायरिंग, यहूदींना पुन्हा लक्ष्य?
3

ऑस्ट्रेलियात पुन्हा हिंसाचार! मेलबर्नमध्ये ख्रिसमसच्या पहाटे फायरिंग, यहूदींना पुन्हा लक्ष्य?

‘हा हिंदूंचा अपमान…’ ; कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड; भारताने घेतला आक्षेप
4

‘हा हिंदूंचा अपमान…’ ; कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड; भारताने घेतला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.