
Pakistan and Afghanistanto hold second border peace talks in Turkey
FATF ची मोठी कारवाई! दहशतवादाला आर्थिक पाठिंबा देणाऱ्या देशांवर लगाम ; दिला गंभीर इशारा
शनिवारी (२५ ऑक्टोबर) तुर्कीच्या (Turkey) इस्तंबूलमध्ये दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु ही वाढती जवळीक भारतासाठी धोक्याचा इशारा ठरत आहे.
यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी कतारची राजधानी दोहामध्ये पाकिस्तान आणि अफगाणस्तानमध्ये युद्धबंदी लागू करण्यावर चर्चा झाली होती. यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने सीमा तणाव दूर करण्यासाठी सहमती दर्शवली आणि पुन्हा दुसऱ्या चर्चेसाठी इस्तूंबलमध्ये भेटीचे नियोजन केले.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, बैठकीचे आयोजन झाले आहे. तसेच पाकिस्तानने आशा व्यक्त केली आहे या बैठकीत ठोस तोडगा निघेल. सीमेवर शांतात निर्माण करण्याशाटी दोन्ही देश योग्य ते निर्बंध सुनिश्चित करतील .
याच वेळी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी देखील याची पुष्टी केली आहे. अफगाणिस्तानचे एक शिष्टमंडळ या बैठकीत पाकिस्तानसोबत सीमा सुरक्षा आणि इतर सर्व मुद्यांवर चर्चा करणार आहे.
काय आहे पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील वाद?
पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे, परंतु काबुलने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. या शिवाय दोन्ही देशांमध्ये ड्युरंड रेषेवरुन वाढत्या अविश्वासामुळेही वाद निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानने ड्युरंड रेषेला अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नाही, यामुळे सीमा वाद सतत वाढत आगे.
तज्ज्ञांच्या मते, सध्या दक्षिण आशियामध्ये या दोन्ही देशांमधील तणाव कमी होणे गरजेचे आहे. वाढत्या अस्थिरतेला रोखण्यासाठी या चर्चा महत्त्वाच्या आहेत. परंतु यामुळे दोन्ही देशांतील राजकीय संबंध पुन्हा प्रस्थापित झाले तर ही बाबा भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीकानोतून गंभीर मानली जात आहे. सध्या भारत अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारशी राजनैतिक आणि धोरणात्मक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांनी भारताला भेट दिली होती. तसेच काबूलमध्ये भारतीय दूतावासही खुला करण्यात आला आहे.