6 महिन्यात दाखवून देऊ....'; रशियावर लादलेल्या निर्बंधांवर डोनाल्ड ट्रम्प यांचा खुला इशारा
अमेरिकेचे रशियावर लादलेल्या निर्बंधांबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मोठ विधान केलं आहे. अमेरिकेने तेल खरेदीसंदर्भात रशियावर लादलेल्या निर्बंधांबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी, ‘अमेरिकेच्या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही.’ तसेच, स्वाभिमानाला प्राधान्य देणारा कोणताही देश दबावाखाली काम करत नाही. अशी प्रतिक्रीया दिली होती. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.
”हा शेवटचा आठवडा?” २९ ऑक्टोबरनंतर सुरु होणार एलियन विरुद्ध मानव युद्ध?
गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ” या निर्बंधांचा खरा परिणाम पुढील सहा महिन्यांत दिसून येईल. त्यांना असे वाटते याचा मला आनंद आहे. सहा महिन्यांत निकाल काय येतो ते मी तुम्हाला सांगेन. पाहूया काय होते ते. दुसरीकडे,काही विशेषज्ज्ञांनी, अमेरिकेने लादलेल्या या निर्बंधांचे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांवर आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर दीघक्षकालीन परिणाम होऊ शकतात. अशी शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यां, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लागू केले. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले दिर्घकालीन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने रशियावर दबाव आणण्यासाठी हे निर्बंध लादले आहेत. निर्बंधांच्या घोषणेनंतर, जागतिक तेलाच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
दरम्यान, ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदीवर निर्बंध लादल्याचा दावा केला होता. भारत रशियाकडून तेल आयात कमी करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. पण दुसरीकडे भारत सरकारकडून या दाव्यावा कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या दबावाखाली असा निर्णय घेतला नाही. भारत सरकारचे आपल्या लोकांना परवडणारे आणि विश्वासार्ह तेल पुरवणे हे ध्येय आहे. तसेच, भारत सरकारकडून देशासाठी सर्वोत्तम निर्णय घेतले जातील,असंही सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत कर लादल्यामुळे भारत आणि अमेरिकेत आणखी काही दिवसांपासून तणाव वाढत आहेत.
दुसरीकडे, युक्रेन रशिया युद्धबंदीसाठी पुतिन प्रयत्न करत नसल्याच्या कारणावरूनही डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. युक्रेन-रशिया युद्धबंदीसाठी या वर्षी दोन्ही नेत्यांची भेट होणार होती. परंतु आता रशियाने अमेरिकेचा युद्धबंदीचा प्रस्तावही नाकारला आहे. त्यामुळे बैठक सध्यासाठी पुढे ढकलली आहे. तर, रशियाने युद्ध संपवण्यासाठी खऱ्या अर्थाने पावले उचलावीत अशी आपली इच्छा आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.






